पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० हिन्दुधर्मशास्त्र. अर्थः-

- माता व पिता मरण पावल्यानंतर भावांनी मिळून त्यांच्या जिंदगीचा समान

विभाग करावा; कारण मातापितर जिवंत असतां ते ( भाऊ ) विभाग करण्यास अधि- कारी होत नाहींत. . यावरून कोणत्याही पितराच्या मरणानंतर त्याच्या जिंदगीचा विभाग पुत्रांनी करावा असेंही सांगितलेले आहे; परंतु जर कन्या नसतील, तर मात्र आईची जिंदगी पु- त्रांस मिळेल; नाहीं तर मिळणार नाहीं.' ६१ ( १९०.) आतां अविभाज्य धनाविषयीं थोडा विचार करूं. आईबापांचें द्रव्य न खर्चितां जें ज्यानें विद्येवर मिळविले असेल, ते धन; तसेंच मित्राकडून मिळालेले; विवाहासंबंधी द्रव्य; व शौर्यानें अथवा मेहनतीने अथवा चाकरीने संपादित द्रव्य; या सर्वावर विभागकाळी दुसऱ्यांचा वारसा नाहीं. तसेंच आईबापांचें द्रव्य न खचिंतां परंपरागत द्रव्य हरण केलेलें, पुनः संपादन केले असेल, तर त्यावरही इतर वारिसांचा हक्क नाहीं. परंतु जर वडिलार्जिताचा स्वल्पच उपयोग होईल तर मिळविलेले समाईक होत नाहीं. ६२ ६३ (१९१.) गोविंददास दुर्लभदास यानें बाई लक्ष्मीवर तिच्या मयत नवऱ्याची इस्टेट घेण्याकरितां फिर्याद केली. त्या क्रज्जांत असे शाबीत झालें कीं, त्या विधवेच्या नवऱ्यानें जी इस्टेट संपादिली होती ती त्याची स्वकष्टार्जित असून बापाच्या इस्टेटीच्या अथवा भावाच्या मदतीशिवाय संपादिली होती त्यावरून ती भावांबरोबर अविभाज्य आणि मयतास पुत्र नसल्यामुळे त्या इस्टेटीची मालक बाई लक्ष्मीबाई असे ठरलें, आणि वादीचा दावा रद्द झाला. ६४ ( १९२.) समाईक इस्टेटाच्या मदतीशिवाय अविभक्त कुटुंबापैकी एकानें आपल्या एकट्याच्याच मेहेनतीनें कांहीं द्रव्य मिळविले असेल, आणि त्या वेळी तो इतर कुटुंबी लोकांबरोबर समाईक रहात असेल, तरी त्याच्या संपादित द्रव्याचा विभाग मागण्यास त्यांस अधिकार नाही. परंतु वडिलार्जित इस्टेटीच्या उत्पन्नांतून विकत घेतली ६५ ६१. मिताक्षरा भाषान्तर पृ० १७९. ६२. मि० ६३. मा० पृ० १८१ ; व्य० म० भा० भाग २ रा पृ० १७८. अहमदभाई वि० कासमभाई इं० ला० रि० १३ मुं० ५३४. ६४. बारोडेलचे रिपोर्ट वा० १ लें, नं० ५१ पृ० २४१ ता० २४६. ६५. मार्लि० डै० वा० १ पृ० १८६ क० ५८; याचप्रमाणे त्याच पृष्ठावरील कलमें ५९, ६१, ६२, ६३, ६५, व पृ० ४८७ यावरील कलमें ६६ व ६७, या कज्जांतही ठराव झाले आहेत.