पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. १४९ ( १८८. ) शूद्रांमध्ये एक मुलगा औरस व दुसरा अनौरस असेल व औरस मरण पावेल तर अनौरस सर्व इस्टेटीचा मालक होईल. त्यांत विधवेला अथवा मुलींना अथवा अनौरस मुलांना निमा हिस्सा मिळतो. सांप्रत असवर्ण स्त्रीशीं विवाह होत नाहीं; ह्मणून शूद्र खेरीजकरून बाकीच्या वर्णांत असा संबंध झाला असता, त्यापासून जी प्रजा होते ती दासीपासून झाली अशी समजावयाची आहे; व तिला शूद्रांमध्ये मात्र दाय घेण्याचा अधिकार पोंचतो; बाकीच्या वर्णांमध्ये नाहीं. Eº मद्रासत अनौरस मुलाला औरस भातंपासून हिस्सा मागतां येतो, परंतु बापापासून ५९ अथवा त्याच्या भावां व मुलांपासून मागतां येत नाहीं. ( १८९.) मनु, अ. ९ श्लो. १०४ यांत असे सांगितले आहे:- “ ऊर्ध्वपितुश्चमातुश्चसमेत्यभ्रातरः समम् | भजेर पैतूकंरिक्थमनीशास्तेहिजीवतेोः|| " 66 - च्या ठाय झालेलाही पुत्र पित्याच्या इच्छेनें विभाग पावतो. पिता मेल्यानंतर, औरस पुत्रांनी त्यास अर्धा वांटा द्यावा. शूद्रापासून दासीच्या ठायीं, असे सांगितल्यानें अर्थात् द्विजाचा दासीपुत्र तर पि- त्याच्या इच्छेनेंही विभाग घेऊं शकत नाही; बाप मेल्यानंतर त्यास अर्ध विभागही नाहीं. औरस पुत्रांच्या अभावीं सर्व जिंदगीही मिळणार नाही, असे मदनरत्नादि ग्रंथांत सांगितलेले आहे. पहा भाग २ रा पृ० १५७. इंदरणतावर वि० रामस्वामी १३ मू: इं० अ० १४१. ५८. राही वि० गोविंद इं. ला. रि. १ मुं. ११४; सदू वि० बायझा इं० ला० रि० ४ मुं० ३७; शेषगिरी वि० गिरेवा इं, ला. रि. १४ मुं २८२. ५९. आग्रा एथील सदर दि० अ० चे निवडक रिपोर्ट, ता. २४ फेब्रुआरि १८५७, वा० २ पृ० ४९१; तसेंच मूर्स् इंडियन अपिलें, वालम ८, पृ० १८-५३, यांत बंगाल्यांत सारण प्रान्तांत रामनगरची जमीनदारी व राज्य, यांबद्दलचा मुकदमा आहे, त्यांत याविषयीं पुष्कळ विचार सांगितला आहे. कोणी एतद्देशीय हिन्दु, यार्णे एका युरोपियन स्त्रीशीं लग्न केलें, व सकुटुंब धर्मान्तर केलें आणि तो ख्रिस्ती झाला; तरी त्याणे जर हिंदुधर्म शास्त्राप्रमाणे व्यवहाराची व्यवस्था ठेविली तर चालेल अर्से ठरले आहे. मूर्स इंडियन अपिलें, वा० ९, पृ० १९५. एका इंग्रेजास २ हिन्दु स्त्रियांपासून ५ मुले झालीं. तीं हिंदुधर्मात असून वाढलीं, व एकत्र रहात होती. पुढें तीं भ्रष्ट ह्यणून त्यांस दायाचा अधिकार नसावा अशी हरकत निघाली. ती कोटीनें रद्द करून, ती मुले हिंदु आहेत व त्यांच्या दायाची व्यवस्था हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे होईल, असा ठराव केलाः . मद्रास हायकोर्ट रिपोर्ट, वा० ३, पृ० ९; याचविषयीं, मैनाबाई वि. उत्तराम हा कज्जा, मूर्स इं० आपलें, वा० ८, पृ० ४०० एथें दाखल आहे, तो पाहावा. त्यांत पुष्कळ विचार सांगितलेला आहे. अशा लोकांस शूद्राविषयींचे दायनियम लागू होतीलर्से दिसते. स्पे० अ० नं० ६१६ स०. १८६३ ( मुंबई हा० रि० वा० १ ले पृ० १९१ ) यांत ब्राह्मणाच्या दासीपुत्नास फक्त अन्नवस्त्राचा हक्क असून त्यास बापानें दिलेली जमीन त्याकडून पुतण्यास परत देवविली असा ठराव झाला आहे. ६०. थमम पिले वि० सुब्वापिले इं० ला० रि० १२ म० ४०१.