पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ६ ५२ त्यांनी पूर्वी विभक्त झालेल्या पुत्रास जर विभक्त झाल्यानंतर अलंकारादिक कांहीं वस्तु ममतेनें दिली असेल तर त्यास विभक्तज पुत्रानें हरकत करूं नये; कारण विभक्तजाचें त्यावर स्वत्व उत्पन्न होत नाहीं असे सांगितलेले आहे.” असें देणे हे प्रीतिदत्त होय; आणि विभक्त झाल्यावर पित्याजवळ जें द्रव्य नवीन संपादित असेल, ते त्यास देण्याचा पूर्ण अधिकार आहेच, त्याअर्थी विभक्तज पुत्राचें अशा देणगीविषयीं कांहीं चालणार नाही. ५३ ५४ ( १८६.) सर्व पुत्रांचे विभाग सारखे होतात असे पूर्वी सांगितलेच आहे. जर प्रथम दत्तक घेतला असून मागाहून औरस पुत्र झाले असतील, तर औरस पुत्राचा चतुर्थांश दत्तकास मिळेल, " असा शास्त्राचा कोणी अर्थ करतात; परंतु मुंबई हायकोर्ट बापाच्या इस्टेटीचा पंचमांश असें ह्मणतें. ६ ५६ ( १८७.) कोणी शूद्रास जर दासीपासून पुत्र झाला असेल तर त्यास औरस पुत्राच्या निम्मे अंश मिळेल, आणि पित्याने स्वतः विभाग केला असतांही त्यास तो अंश देऊ शकेल. ५७ ५१.. मि० भा० पृ० १९३. ५२. मि० मा० पृ० १९३. ५३. याविषयों व्यवहारमाधवांत लिहिलेले आहे की, आईबाप पूर्वविभक्त पुत्रास प्रीतीनें द्रव्य देतात तर विभक्तज पुत्रास त्यांचा निषेध करण्याचा अधिकार नाहीं, आणि त्यांनी त्यांस दिलेलें विभक्तजानें परतही घेऊं नये. “विभक्तेभ्यः पितृभ्यामर्थदानेविभक्तजपुत्रस्यनिषेवाधिकारोनास्ति । दत्तञ्चवेतनंन प्रत्याइर्तव्यमित्याइयाज्ञवल्क्यः । पितृभ्यांयस्ययद्दत्तं तत्तस्यैवधनंभवेदिति ।” अर्थः - आईबाप पूर्वविभक्त पुत्रांस जर द्रव्य देतील, तर त्याविषयों विभक्तज पुत्रास निषेध करण्याचा अधिकार नाहीं, आणि त्यांनी दिले ते त्यानें परत घेऊं नये, अर्से याज्ञवल्क्य सांगतो. आईबापांनी जे ज्यांस दिलें तें त्यांचंच ( स्वसत्तात्मक होतें.) याविषयीं व्यवहारतांडव ग्रंथीं कमलाकरभट्टानें लिहिले आहे की, “विभागात्प्रागूर्धवापितृभ्यांभ्रात्रे प्रीतिदत्तेग्यस्यनस्वाम्यमित्याह याज्ञवल्क्यः पितृभ्यांयस्ययदत्तंतत्तस्यैवधनंभवेत् ।” अर्थः—आईबापांनी विभाग होण्यापूर्वी किंवा नंतर ज्यास जें प्रीतीनें दिले असेल त्याजवर दुसऱ्यार्चे स्वत्व नाहीं, अर्से याज्ञ- वल्क्य सांगतो. आईबापांनी जे ज्यास दिलें तें त्याचे (स्वसत्तात्मक ) होतें. ५४ भाग २ पृ० १५२. ५५. प्रकरण ३ रे क० ४४ पहा; अय्यारु मुप्पवार वि० नलिदक्षी म० हा० रि० व्हा० १ पा० ४५. ५६. गिरिआपा वि० निंगपा, इं० ला० रि० १७ मुं० १००. ५७. व्यवहारमयूख, पृ० ९८, " शूद्रेणापरिणीतायामुत्पने विशेषमाइ याज्ञवल्क्यः जातोपिदा- स्यांशूद्रेणकामर्तोशहरोभवेत् । मृतेपितरिकुर्युस्तंभ्रातरस्त्वर्धभागिकम् ॥ शूद्रेणेतिपदात् द्विजातिभिर्दास्या- मुत्पन्नस्तुपित्रिच्छयापिनांशभाक्नापिपितृमरणोत्तरमर्द्धनापिपुत्रा द्यभावेसर्वमितिमदनरत्नादिषु । "अर्थ:- शूद्रापासून अविवाहित शूद्रेच्या ठायीं झालेल्या पुत्रांविषयीं विशेष याज्ञवल्क्य सांगतो. शूद्रापासून दासी-