पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. १४७ (१८१.) कोणी अविभक्त बंधु मरण पावला तर त्याचा पुत्र आपल्या चुलत्या- कडून किंवा चुलत भावाकडून बापाचा हिस्सा घेईल. तोच हिस्सा त्याच्या सर्व भावांचा विभाग होतो. ४९ प्र० ६ ( १८२.) विभाग झाल्यानंतर, सवर्ण स्त्रोपासून उत्पन्न झालेला पुत्र मातापितरां- च्या मागून त्यांच्या द्रव्याचा विभागी होतो. परंतु आईचा अंश, जर कन्या नसेल तर मात्र त्यास मिळेल. कन्या. असेल तर त्यास मिळणार नाहीं. जो आईबापांपा- सून पूर्वी विभक्त झाला, तो त्यांच्या अंशाच्च मालक होत नाहीं; आणि विभागानंतर झाला तो पहिल्या भावांच्या अंशाचा मालक होत नाहीं; परंतु जर विभक्त झालेले पुत्र, पित्याशीं पुनः संसृष्ट झाले असतील, तर विभागानंतर झालेल्या पुत्रानें पित्याच्या पाठी- मार्गे विभाग करून घ्यावा. ४७ ( १८३.) विभक्तज व पूर्वविभक्त यांचा जसा परस्पर धनावर संबंध नाहीं, त्या- प्रमाणेच ऋण, दान, गहाण, खरेदी यांवरही त्यांचा परस्पर संबंध नाहीं. परंतु बाप मेला आणि त्याची इस्टेट नसून नुसतें कर्ज मात्र असेल, तर विभक्तज पुत्रानें पूर्वी विभक्त झालेल्या भावांपासून आपला विभाग घेतल्यावांचून ते कर्ज देऊं नये. कारण जो रिक्थ घेतो त्याकडून कर्ज देववा असे सांगितलेले आहे.. ४८ एकानें आपल्या पहिल्या स्त्रीपासून झालेल्यां पुत्रांस जिनगीचे वांटे दिले; नंतर दुसर्रे लग्न केलें, आणि पुढें उद्योग करून पूर्वीच्या मिळकतीहून अधिक मिळकत सं- पादिली. तर अशा प्रसंगी ती मागाहून मिळविलेली जिंदगी द्वितीय संबंधापासून झा लेल्या प्रजेकरितां आपल्या दुसऱ्या पत्नीस ती सर्व देण्याचा त्यास अधिकार आहे, असा आग्रा येथील सदर कोटीने ठराव केला. ४९ ( १८४.) दुसरें, प्रथम पिता एका पुत्रापासून विभक्त झाला; नंतर त्यास दुसरा पुत्र झाला; तो पित्याकडून विभाग घेऊन विभक्त झाला; पुढे तिसरा पुत्र उत्पन्न झाला; तो बापाच्या मरणसमयी अस्पष्टगर्भ अशी आई असतां तिजपासून उत्पन्न झाला, तर या तिसऱ्या पुत्रानेंच आपल्या बापाचें धन घ्यावें; पहिल्या भावाकडून किंवा दुसऱ्या भा वाकडून त्यानें कांहीं घेऊं नये." ५० ( १८५.) मातापितरांचें सर्व द्रव्य घेणारा विभक्तज पुत्र असे सांगितले; परंतु ४६. व्य० म० भाषांतर भा० २ रा पृ० १५५. ४७. मि० मा० पृ० १९१. ४८. व्य० म० भ० २ रा पृ० १५८. ४९. आग्रा सदर कोर्टाचे रिपोर्ट सन १८६२ चे, पृ० ७१ पहा. ५०. वीरमित्रोदयग्रंथ, प० १८२ पृ० २ पं० ९.