पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ६ ( १७७.) पिता मरण पावल्यानंतर वांटे करणाऱ्या भावांनी आपल्या आई- सही आपल्या विभागाबरोबर विभाग द्यावा; परंतु जर ती निर्धन असेल तर द्यावा; आणि सधन असेल, तर जितक्याने तिचे स्त्रीधन पुत्रविभागाशीं सम होईल तितका वांटा द्यावा. जर मूळचेंच स्त्रीधन विभागापेक्षा अधिक असेल, तर मुळीं कांहींच देऊ नये.. तिचा हक्क विभागाच्या वेळीं ध्यानांत ठेवला पाहिजे. जरी इस्टेटीवर निवाडा होऊन विक्री झाली असेल तरी, जेव्हां इस्टेटीचे विभाग होतील तेव्हां तिचा हिस्सा तोडून दिला पाहिजे." सावत्र आई हिश्शास पात्र आहे. * ४२ ( १७८.) बापाच्या पश्चात् त्याच्या मुलांनीं वांटणीची फिर्याद आणिली. ते मुलगे भिन्न आईपासून झाले होते. कलकत्ता हायकोर्टानें असें ठरविलें कीं, सर्व पक्षकार केल्यावांचून दावा चालावयाचा नाहीं; कारण वांटणीच्या वेळीं आईंस हिस्सा मिळण्याचा अधिकार आहे. ' ४३ ( १७९. ) आईच्या निपुत्रिक सवती, व पितामही ( बापाची आई ) व तिच्या संवती, यांस आईसमान मानिल्या आहेत, याकरितां त्यांसही समविभाग द्यावा, असे सांगितलेलें आहे. ४४ आतां ४२ व्या टिपेंतील ठराव सावत्र आईसंबंधानें अवश्य पहावा. ( १८०. ) अनेक बंधूंच्या पुत्रांचा विभाग करणें, तो त्यांच्या पित्यांच्या द्वारें करावा. ह्मणजे एकाला एकच पुत्र, दुसऱ्याला दोन, तिसऱ्याला तीन, असे आहेत, तर आपापल्या पित्याचा जो अंश, त्याचे पोटांत प्रत्येक पुत्राचा विभाग करावा; विभाग कर णाऱ्या पुत्रांच्या संख्येवर विभाग होत नाहीं. ४५ ४०. व्यवहारमयूख भाषांतर भाग २ रा पृ० १५४; व मिताक्षरा भाषांतर पृ० १९४; स्पे० अ० नं० १४८ सन १८६४ यांत विधवेला अन्नवस्त्र किती मिळावें, याविषयीं मुंबईच्या हायकोर्टानें ठराव केला आहे; त्यांत अन्नवस्त्राची नेमणूक पुत्राच्या हिशाहून अधिक असूं नये, परंतु त्या हिशापर्यंत असावी अर्से ठरलें आहे. हा ठराव वरील शास्त्रार्थास अनुसरूनच आहे. इं० का० रि० ५ क० ८४५; ८ क० १७; १२ क० १६५ पहा. ४१. बिळासो वि० दिनानाथ इं० ला० रि० ३ अ० ८८; रामप्पा वि० सीथामल इं० ला० रि० २ मै० १८२. ४२. दामोदर वि० उत्तमराम इं. ला. रि. १७ मुं. २७१. ४३. तोरित भूषन बानरजी वि० तारा प्रसन्न बानरजी. इं. ला. रि. क. व्हा. ४ पा. ७५६. ४४. व्यवहारमयूख भाषांतर भाग २ रा पृ० १; याप्रमाणे सांप्रत वहिवाट चालत नाहीं. या स बसि त्यांच्या व कुटुंबाच्या योग्यतेप्रमाणे अन्नवस्त्र मात्र देतात, व तितकें मागण्यास त्यांस अधिकार आहे असे चालू वहिवाटीवरून दिसतें. पितामहीला कांही अंश देण्यांत आलाः ४५. व्य० म० भाषांतर भा० २ रा पृ० १५४. इं. ला. रि. ७ क. १९१.