पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. वर सांगितलेला प्रकार विभक्त झालेल्याचे विभाग जमाखर्चावांचून असल्यास जाणावा, आणि जमाखर्च झालेला असेल तर त्याची तपासणी करून बाकी राहिलेल्या द्रव्यांतून विभक्तज जो पुत्र त्यास विभाग द्यावा. ३५ ( १७४.) जर भावजय किंवा आई गरोदर आहे असे विभागकाळी समजण्यांत आलें असेल, तर त्या प्रसूत होत तावत्कालपर्यंत वाट पाहून नंतर विभाग करावा. याविषयीं पूर्वीच्या कलमीं लिहिले आहे व तो पक्ष उत्तम होय. कोणी हिस्सेदार जर अज्ञान असेल तर त्याचा हिस्सा काढून ठेवल्याशिवाय व त्याच्या तर्फेच्या इसमाची संमति घेतल्याशिवाय विभाग केला तर तो अज्ञानाच्या संबंधानें अशास्त्र आहे, व त्याला वगळला असें त्यास माहीत होईल अगर त्यानें हिस्सा मागून दिला नाहीं, तेव्हांपासून त्याच्याविरुद्ध मुदत सुरू होते. अगोदर विभाग होऊन नंतर मुलगा झाला तर त्याला बापाचाच हिस्सा मिळेल असें ला. रि. ४ इं. अ. ४२७ ह्यांत ठरले आहे. परंतु इं. ला. रि. ६ म. ६४ ह्यांत पुन्हा विभाग करावा असें ठरविलेले आहे. 3 w • ( १७५.) पिता मृत झाल्यानंतर विभक्त होणे, हा मुख्य पक्ष; व न होणे हा गौण पक्ष आहे, असें शास्त्रकारांनी सांगितले आहे. ३ ३७ ( १७६.) पिता मेल्यानंतर विभाग करणाऱ्या भावांनी जे असंस्कृत बन्धु अस तील त्यांचे सस्कार समायिक पितृद्रव्यांतून करावे. जो भावांविषयी प्रकार सांगितला, तोच बहिणींविषयींही जाणावा; ह्मणजे अविवाहित बहिणी असतील, तर त्यांचा विवाह करावा; परंतु पूर्वी ज्यांचे संस्कार झाले असतील, त्या बंधूनी आपापल्या अंशांतून च तुर्थांश देऊन बहिणींचे संस्कार करावे." अपत्यांचें उपनयन व विवाह आदीकरून संस्कार झाल्यानंतर विभाग करावा. संस्कार झाले नसतील, तर संस्कार होण्यास पुरे असे द्रव्य निराळें काढून बाकीच्या द्रव्याचा विभाग करावा, असे व्यवहारताण्डव ग्रंथीं कमलाकरभट्टानें लिहिलें आहे. ३५. व्य० म० भाग २ रा, पृ० १५८. ३६. कृष्णाबाई वि० खानगौडा इं० ला० रि० १८ मुं. १९७. 66 ३७. व्य० म० भा० भाग २ रा पृ० १५९; कमलाकरभट्टकृत विवादताण्डव, यांत झटलेले आहे:- 'पितुर्मरणोत्तरं विभागो मुख्य: कल्पः अविभागोनुकल्प: ” अर्थ:-पित्याच्या मरणानंतर विभाग [ करणे हा ] मुख्य पक्ष, न करणे [ हा ] गौण पक्ष [ आहे ]. ३८. व्य० मयूख भा० भाग २ रा पृ. १५९, मिताक्षरा भा० पृ० १९४. ३९. तेन सर्वापत्यानां उपनयनविवाहादौ जाते विभागः अजाते सति धनं पृथक्कृत्य विभागः स च विभागः सर्वभ्रातृभगिनीसंस्कारोत्तरं कार्य: ” अर्थः– अपत्यांचे उपनयनविवाह। दिसंस्कार झाल्यानंतर विभाग करावा, आणि ते झाले नसल्यास, त्यांच्या संस्कारांस पुरे इतकें द्रव्य निराळे ठेवून विभाग करावा. १९