पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ हिन्दुधर्मशास्त्र. ते मागाहून होतील. बंगाल्पाच्या हायकोर्टानें, मिताक्षरा, मयूख, इत्यादि ग्रन्थांच्या आ- धारावरून तारीख २१ जून १८६७ रोजी. असा ठराव केला आहे कों, मी तुजपासून वेगळा झालो, असे सांगितलें असतां विभक्तपणा होतो; जरी त्या वेळीं इस्टेटीचे प्रत्यक्ष विभाग झाले नाहींत तरी चिंता नाहीं." मुंबई हायकोर्टाचाही असा एक ठराव झाला आहे. लेखी फारखतीची आवश्यकता नाहीं, परंतु वाद मिटण्यासाठी लेख असावा हें बरें. जरी कागद नसला तरी जर इष्टेटीचें वांटप होऊन स्वतंत्र वहिवाट असेल तर पुरे होतें.”. ३० विभागाचा हुकुमनामा झाला की विभक्तपणा होतो, मग स्पष्ट विभागण्याची फिर्याद नसली तरी हरकत नाहीं असें जयनारायण वि० गिरिशचंद्र ( इं. ला. रि. ४ क. ४३४ ) प्रि. कौ. व चिदंबर वि. गौरी ( इं. ला. रि. २ म. ८३ ) ह्यांत ठरलें होतें. परंतु जोपर्यंत अपील होत आहे तोपर्यंत असे होत नाहीं. ३२ ( १७३. ) पित्याच्या मागून विभागणाऱ्या पुत्रांनी विभाग सारखे करून घ्यावे. परंतु स्त्रिया गरोदर असल्यास, त्या प्रसूत होत तोपर्यंत विभाग करूं नये. त्र० पित्याच्या पाठीमागें विभाग करते वेळी आई, सावत्र आई, किंवा भावाची स्त्री गरोदर असून विभाग करणान्यास समजलें नाहीं आणि विभाग झाला, तर त्यांपासून झालेल्या पुत्रास विभक्त झालेल्या बंधूंनी आपापल्या अंशांतून कांही काढून आपल्या वांट्यासमान वांटा द्यावा. ३४ ते प्रि. कौ. च्या ठरावाच्या व मयूखाच्या विरुद्ध दिसते. परंतु जरी वादीनें हिश्शासाठी फिर्याद स्पष्ट केली नसेल तरी जर हिस्सा मागण्याचा हेतु दिसेल व तो कोटीनें दिला असेल तर विभक्तपणा होतो. इं० ला ० रि० ४ क० ४३४; इं० ला० रि० ६ अ० १७७ हाही ठराव पछावा. २९. स्पेशल अ० नं० ३१५७ सन १८६६. सदलैंड वीक्ली रिपोर्टर वा० ८, दिवाणी मुकदमे पृ. ८२; याशिवाय रे० अपिलें नं० ३०७ व ३०८ सन १८६६, स० वी. रि०वा० ६ दि० मु० पृ० १३९ तागायत १४६ यांतही याविषयी पुष्कळ विचार सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे ता० १७ नोवेंचर सन १८६६ रोजी प्रिव्ही कौन्सिलांत एक ठराव झाला आहे. आणखी नवीन ठराव तेजप्रतापसिंह वि० चं- पाकुलीकुमारी, इं ला. रि. १२ क. ९६. आदिदेव वि० दुःखराम इं. ला. रि. ५ अ० ५३२. आशाबाई वि० हाजतियब, इं. ला. रि. ९ मुं. १११. ९ बाबाजी वि० काशीबाई, इं. ला. रि. ४ मुं. १५७, ४ मू इं. अ. पृ १३७. ३०. अनंत बाळाचार्य वि० दामोदर मुकुंद, इं. ला. रि. १३ मुं. २५. ३१. बुधमल वि० भगवानदास इं. ला. रि. १८ क. ३०२. ३२. सखाराम वि० हरी, इं. ला. रि. ६ मुं. ११३. ३३. झणजे आपली आई, किंवा सापत्न आई, किंवा बन्धु, पुत्र, पुतणे, नातु, इत्यादि विभागी यांच्या विधषा. ३४. व्य० म० भाषांतर भाग २ रा पृ० १५९.