पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दायविभाग. निराळ्या बायकांचे असले तरी सर्वांना सारखाच विभाग मिळावयाचा. झाला तर मात्र विषम विभाग होऊं शकतील. २३ ( १७०.) जर पिता पुत्रांचे समान विभाग करील, तर त्यानें आपल्या पत्नीसही समान अंश द्यावे; परंतु नवऱ्याने किंवा सासऱ्यानें त्यांस स्त्रीधन दिलेलें नसेल तर द्यावे, आणि जर स्त्रीधन दिलेले असेल, तर अर्धा विभाग द्यावा, २४ व आपणही पुत्रांच्या अंशांसमान अंश ध्यावा. २५ २२. १४३ कुलाचार शाबीद २६ ( १७१.) द्रव्य संपादण्याविषयीं समर्थ असा पुत्र जर विभागाची इच्छा करीत नसेल तर त्यास यत्किंचित् कांहीं तरी देऊन फारखत करावी. किंचित् त्यास द्यावें, आणि फारखत करावी, असे सांगितले; याचे कारण त्याच्या पुत्रादि वंशजांस पुढे दाय घेण्याची इच्छा न व्हावी हेच होय. यावरून किंचित् देणें हें दृष्टार्थ आहे, अदृष्टार्थ नाहीं; याजकरितां जरी कांहीं न देतांही फारखत केली, तरी शास्त्रतः दोष आहे असा अर्थ नाहीं; ह्मणून अशी झालेली फारखत रद्द होईलच असें समजूं नये.२७ ह्यासंबंधानें कांहीं ठराव पुढे दिले आहेत. २२. मंजनाथ वि० नारायण इं. ला. रि. ५ म..३६२. २३. रामनिरंजन वि० प्रयाग इं० ला० रि० ८ क० १३८. ( १७२.) याविषयीं• मयूखकार ह्मणतो “बुद्धिमात्रमेवहि विभागः” अर्थः-[ मी विभक्त झालों अशी ] जी बुद्धि, तिचेंच नांव विभाग. तात्पर्य, एकत्रपणा आणि वि भक्तपणा हे मूळ बुद्धीचे धर्म आहेत; ह्मणून तशी बुध्दि कायम झाली, ह्मणजे तो दायाद विभक्तच झाला असे समजावें; केवळ इस्टेटीचे विभागच करण्याचें कारण नाहीं. २८ २४. अर्धा विभाग ह्मणजे, जितका विभाग त्यांच्या स्त्रीधनांत मिळविला असतां एकंदर अंश पुत्राच्या अंशाइतका होईल, तेवढा विभाग; मिताक्षरा मा० पृ० १७५; व्य० मयूख भा० भाग २ रा० पृ० १५२-३. २५ मिताक्षरा भा. पृ. १७५, व्य. मयूख भाग २ रा, पृ. १५३ जर विभाग करणाऱ्या पि- त्यास एकच पुत्र असेल तर त्याणें विभाग करतेवेळी दोन अंश आपण घ्यावे; परंतु जर स्वसंपादित द्रय आहे तर, पितामहानें संपादित असेल तर, पुत्राच्या अंशाबरोबरच पित्याचाही अंश जाणावा; व्य० मयूख भाग २ रा, पृ० १५३. २६ मिताक्षरा भा० पृ० १७६; व्य० मयूख भा. भाग २ रा पृ० १५४. २७. व्य० मयूख भा. भाग २ रा पृ. १४८. २८. ११ मू. इं. ला. रि. अ. पृ. ११३ व्हा. १ पृ. ९ व ५५. स. वी. रि. व्हा. २३; पृ. ४१२ ह्यांत बांटपाचा ठराव झाल्यावर घडे पाडल्याशिवाय कांहीं जमीन मक्त्यानें दिली. तेवढ्यावरून ते आपापल्या हिश्शाचे हिसेदार नाहींत अर्से होत नाहीं असे ठरले. परंतु नुसता विभाग करण्याचा हेतुच दर्शवून उपयोग नाहीं असें इं० ला० रि० ४ मुं० १५७ ह्यांत ठरले आहे, परंतु