पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ६ ११ १२ 93 झाली नाही.' ‘खोजे लोकांना देखील हें लागू आहे. ' बाप व त्याचे भाऊ जर एकत्र असतील तर मुलास बापाच्या इच्छेविरुद्ध त्याच्या व चुलत्यांच्या हयातीत वडिलार्जित इस्टेटीचा हिस्सा मागतां येणार नाहीं, असें सातारच्या एका अपिलांत फुल बेंचानें ठरविलें आहे. परंतु ह्या वेळी ज० तेलंग ह्यांचा अभिप्राय विरुद्ध पडला होता." बाप व आजा हयात असतां नातवाला हिस्सा मागतां येतो, तो हुकुमनाम्याच्या बजावणींत विकतां येतो असें जुगुल वि० शिवसहाय इं. ला. रि. ५ अ ह्यांत ठरलें होतें; परंतु मुंबई हायकोर्टा विरुद्ध अभिप्राय आहे. ४ अविभाज्य इस्टेटीवर बाप आहे तो मुलाचें स्वत्व नाहीं.' १५ ( १६८.) क्वचित् पिंतामहसंपादित द्रव्याचा विभाग पित्याच्या इच्छेने सांगि- तलेला आहे. पितामहार्ने संपादिताचें कोणी हरण केले, आणि तें पितामहाकडून हस्त- गत झालें नाहीं, व तें जर पिता हस्तगत करून घेईल, तर त्याचा विभाग पित्याची इच्छा नसेल तर होणार नाहीं. [१६] ( १६९.) जर पिता विभाग करण्यास समर्थ आहे, तर ज्येष्ठ पुत्राच्या अनु- मतीनें विभाग करावा, किंवा ज्याचा अनुज व्यवहार जाणता असेल, त्याने ज्येष्ठाच्या अनुमतीने करावा. असमर्थ ह्मणजे दीन अथवा प्रवासास गेलेला, किंवा अचिकित्स्य महारोगानें ग्रस्त झालेला. सारांश, कुटुंबाच्या पोषणादिकांविषयीं जो समर्थ असेल, त्याच्या इच्छेनें विभाग होतो. सर्व तसे असल्यास अमुकानेंच करावा असा नियम नाहीं. कोणाच्या तरी एकाच्या अनुमतीनें विभाग होतो." विभाग करणाऱ्या पित्यानें सर्व पुत्रांस द्रव्याचे सारखे अंश द्यावे." शास्त्रांत विषम विभाग व उद्धार" विभाग सांगून त्याचा निषेध सांगितलेला आहे, यास्तव सर्वदा सामविभागच करावा. विषम करूं नये." बापास मृत्युपत्र करून मुलांचे विषम विभाग करतां येत नाहींत. " मुलगे निर- २१ ● ११. जगमोहनदास वि० सर मंगळदास इं० ला० रि० १० मुं० ५२८. १२. इं० ला० रि० १२ मुं० २८०. १३. आपाजी वि० रामचंद्र इं० ला० रि० १६ मुं० २९. १४. इं. ळा. रि. १० मुं० २९. १५. सैतानकुमारी वि० देवराजकुमारी इं० ला० रि० १० अ० २७२. १६. व्यवहारमयूख भाषान्तर; भाग २ रा पृ० १५९. १७. व्यवहारमयूख भाषान्तर, भाग २ रा पृ० १५०. १८. मिताक्षरा भाषान्सर, पृ० १७४; १९. सर्व वस्तूंत उत्तम असेल ती, व द्रव्याचा विसावा हिस्सा, इतका अधिक ज्येश्वास द्यावा, अर्से झटलेलें आहे तो उद्धार विभाग. २०. मिताक्षरा भाषान्तर, पृ० १७९ व्यवहारमयूख भाषान्तर भा० २ पृ० १५१, बारोडेलचे रिपोर्ट, वा० २, पृ० ५२, नं० १०, जयराम सदाशिव शारंगधर वि० लक्ष्मण रघुशेट शारंगधर, २१. लक्ष्मण नाईक वि० रामचंद्र नाईक इं० ला• रि० १ मुं० ५६१.