पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ६ दायविभाग. १४१ आणि. पिता जिवंत असतां द्रव्याविषयीं निस्पृह व निवृत्तरमण आहे, किंवा आई निवृ- त्तरजस्क आहे, तर पित्याची विभाग करण्याची इच्छा नसेल तरी पुत्रांच्या इच्छेनें विभाग होतो. तसेंच आई सरजस्क, व पिता इच्छित नाहीं, आणि अधर्मवर्ती अथवा महारो- गग्रस्त आहे, तर पुत्रांच्या इच्छेनें विभाग होतो. अमुक इस्टेटीचा विभाग कधींच करा- वयाचा नाही असा करार अशास्त्र आहे. " ( १६७.) पिता द्रव्य विभागण्याविषयी अधिकारी असें जें सांगितलें तें पित्यानें जें संपादित असेल त्याविषयी समजावें. जर पितामहार्जित द्रव्य असेल तर त्यावर पित्याची व पुत्रांची मालकी सारखी आहे, याकरितां पित्याची इच्छा नसली तरी पुत्रांच्या इच्छेनें विभाग होतो.' नातवाला बापाच्या व आजाच्या हयातीत हिस्सा मागतां येतो." व्यवहार- मयूखाचा अमल आहे अशा प्रदेशांत सुद्धां बापाच्या हयातीत मुलास स्थावरजंगम वडिला- जिंत इस्टेटीचा हिस्सा मागतां येतो; वडिलार्जित इस्टेटीच्या मदतीने मिळविलेली वडिला- जिंत, मग ती मुलाच्या जन्माच्या अगोदर मिळविलेली असो अगर नसो; व मृत्युपत्रानें मिळ- विलेली, अथवा गेलेली मिळालेली, वडिलार्जितच समजावयाची; कपोल बनिया जातींत बापाच्या हयातीत मुलास हिस्सा मिळत नाहीं अशी तक्रार ह्याच कज्जांत झाली होती परंतु ती शाबीद ८ ४. ह्मणजे ज्याची स्त्रीविषयों इच्छा नाहींशी झाली आहे तो. ५. मिताक्षरा भाषान्तर, पृ० १७५. ६. मिताक्षरा भाषान्तर, पृ० १७५. ७. रामलिंग वि० विरूपाक्ष इं० ला० रि० ७ मुं. ५३८. ८. मिताक्षरा भाषान्तर, पृ० १८९. ९. वेंकट सुबम्मा, विरुद्ध र्वेकम्माल, कज्जा नं० १२ स० १८१८ मद्रास सदर अदालतीचे निवाडे, वा० १ ले पू० २१०; नागलिंग मुद्दली वि. सुब्रह्मण्य मुद्दली, मुं हायकोर्ट, रि० वा० १ लें. पृ० ७७; सदरहु कोर्टाचे रिपोर्ट वा० २ पृ० ४१६. स्पे० अ० नं० १८८ सन १८६५; वायव्येच्या प्रान्तां- तील सदर अदालतीचे निवडक निवाडे, वा १ ले पृ० २७९; मुंबई सदर दिवाणी अदालतीचे रि० ( १८२० पासून ४० पर्यन्त) नं० १२ पृ० ४१ व ४२ व शेवटची टीप; बेलासिस् रि० पृ० १६, स्पे० अ० नं० ३६४१; हे याचे कलकत्ता हायकोर्ट रि० सन १८६३, पृ० २०५; सदरलंड वीक्ली रिपोर्टर (बंगाल) वा० ५ पृ० ५४, रेग्युलर अ‍० नं० २७८ सन १८६५; सदरहु ग्रंथाचें वा० ७, पृ० ५०२ रेग्युलर अ० नं० ३६४ स० १८६६ ता० २९ मे १८६७. या सर्व निवाड्यांवरून पितापुत्रांची सत्ता समान आहे असे सिद्ध होतें. सुरजबनसी कुवर वि० शिवप्रसाद ला० रि० ६ इं० अ० ८८; म० हा० को० रि० व्हा० ३ पृ० १६; कालीप्रसाद वि० रामचरण इं० ला० रि० १ अ० १५९. १०. जुगुलकिशोर वि० शिवसहाय; इं० ला• रि० ५ अ० ४३०.