पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावें. दायविभाग. परिच्छेद १ ला. विभाग करणे इत्यादि. ( १६५. ) पिता किंवा इतर कोणीही संबंधी यांजकडून जें सशास्त्र संबंधापासून मिळण्याजोगें द्रव्य असेल, त्याचें नांव दाय. तो दोन प्रकारचा आहेः एक सप्रतिबंध ह्मणजे अटकावलेला, व दुसरा अप्रतिबंध ह्मणजे खुला.' उदाहरण- चुलत्यांचे द्रव्य किंवा भावाचें द्रव्य, यास दुसरे नवळचे वारीस यांचा प्रतिबंध आहे; ह्मणून हा सप्रतिबंध दाय. जर चुलत्यास मुलगा किंवा आपल्याहून जवळचा दुसरा वारिस असला, तर ते आपणास मिळावयाचें नाहीं; परंतु त्यांच्या अभावी मिळेल ह्मणून हा सप्रतिबंध दाय झाला. क्रयादिक स्वत्वोत्पादक उपायांची गरज न लागतां जेथें धनस्वामीशी संबंध आहे, इतक्याचमुळे जेथें स्वत्व उत्पन्न होतें, तो• अप्रतिबंध दाय ह्मटला आहे; जसे पुत्राला बापाचें द्रव्य मिळणें हा अप्रतिबंध दाय आहे; कारण पुत्र उत्पन्न झाला ह्मणजे बापाच्या द्रव्या- वर त्याची सत्ता उत्पन्न होते. ( १६६.) आतां, विभाग करण्याविषयीं अधिकारी व काल. ( १ ) पिता स्वतंत्रपणानें वागण्यास योग्य असतां त्याच्याच इच्छेनें पुत्रांनी द्रव्याचा विभाग करावा; ( २ ) आणि तो पतित किंवा संन्यस्त इत्यादि कारणांनी स्वतंत्रपणानें वागण्यास योग्य नसेल तर पुत्रांच्या इच्छेनेंही विभाग होतो; आणि ( ३ ) पिता मेल्या- नंतर पुत्रांचीच इच्छा विभाग करण्याविषयी कारण आहे. मिळून द्रव्यविभागाचे तीन काळ वीरमित्रोदयग्रंथी सांगितले आहेत. ' २ व्याधित, कुपित, व ज्याचें अंतःकरण विषयासक्त आणि शास्त्रविपरीत करणारा, असा पिता विभाग करण्याविषयीं अधिकारी नाहीं. 3 जेव्हां पित्याची विभाग करण्याची इच्छा आहे, तो एक विभागकाल होतो; १. भाग २ रा, पृ० ४७ मिताक्षरा भाषान्तर. पृ० १६२. • २. प० १७१, पृ० १२ पंक्ति ११. ३. मिताक्षरा भाषान्तर, पृ० १७७; परंतु ही सर्व कारणे सांप्रत न्यायाच्या कोडतांत चालतील अर्से वाटत नाहीं. कित्येक वर फारच अनियमित आहेत; यास्तव तीं कधीं तरी चालली असतलि की काय, याविषयींदी संशय आहे.