पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ५ कल्पित आहे असा प्रश्न खाली उतारा दिला आहे. त्यांत आह्मां उभयतांचा हा एक पुत्र असा स्पष्ट करार होऊन जें यामुण्यायण प्रकारचं दत्तावधान होते त्या स्थली मात्र दत्तक आपल्या जनकाचें श्राद्धादिक करूं शकतो अन्यत्र नाहीं असें ह्मणणारे आहेत त्यांस अनुलक्षून कमलाकरभट्ट यांणी प्रश्न विचारला आहे. त्याचा जवाब कांहीं एक न देतां मि० कोलब्रूक यांणी सदर प्रकारचा अभिप्राय आधार कांहीं न देतां दर्श- विला आहे व येथील हायकोर्टातील अलीकडील न्यायाधिशांनी देशाचार न पाहतां तो मान्य केल्यासारखें दर्शविलें आहे हे प्रशस्त ह्मणतां येणें कठिण दिसतें. याच संबंधानें असेही सांगणे एथें जरूर दिसतें कीं, पिण्डदान हाच एक पितरांच्या उद्धाराचा मार्ग आहे, अन्य मार्ग नाहीं, असें हिंदुधर्मशास्त्र ह्मणत नाही. स्वाध्यायपठन, दान, तीर्थयात्रा, पुराणश्रवण, योग, संन्यास, इत्यादि मोक्षसाधनाचे अनेक मार्ग आहेत. त्यांत संन्या- शानें तर श्राद्धे न केली असतां चालेल इतकेंच नसून, करूंच नये असा निषेध सांगितलेला आहे." यावरूनही श्राद्धलोपाचा संभव आहे ह्मणून दत्तविधान अशास्त्र असे ह्मणणें हें अ- प्रयोजक अर्थात् होतें. 99 ( १६१.) गृहस्थाश्रम्यास श्राद्धे किती अवश्य कर्तव्य आहेत ती पूर्वी सांगि- तलीं, परंतु यांतील आचारांत फारच थोडी अवशिष्ट राहिली आहेत; व अन्य कर्मात ज्या- प्रमाणे मूलस्मृतिशास्त्र आचारानें क्वचित् थोडें फार बदलत गेलेले आढळते त्याप्रमाणे श्राद्धां- तही आचाराचे ह्मणून फेरफार आहेतच. सांप्रत मृताच्या प्रथम वर्षाच्या क्रिया, ( चालेल तितका संक्षेप करून ), सांवत्सरिक श्राद्ध, महालय श्राद्ध, त्रिस्थली यात्रा, इतकींच आ- ढळण्यांत येतात. अन्य श्राद्धांचा दिवसेंदिवस लोप होत आहे. ( १६२. ) श्राद्धविधानाप्रमाणे सर्व होणें अनुकूल नसल्यास ( १ ) विप्राच्या अभावीं दर्भबटु करावा ( २ ) आमश्राद्ध करावें ( ३ ) सांकल्पिक श्राद्ध करावें ( ४ ) फक्त पिण्डदान करावें ( ५ ) हिरण्यश्राद्ध करावें (६ ) तिलकुशांनों तर्पण करावें (७) गाईस गवत घालावें ( ८ ) कांहींच न मिळे तर ऊर्ध्वबाहु होऊन पितरांची तृप्येय प्रार्थना ८. स्ट्रेंज मा० २ पृ० १०७. ९. मुं० हा० रि० व्हा० १२ पृ० ३९६. १०. माझें व्य० म० इंग्रजी पुस्तक पृ० ४५६, ४१७ पाहा. ११. नि० सि० परि० ३ श्रा० पं० ६८ पृ० १ नकुर्यात्सूतकं भिक्षुः श्राद्धपिण्डो- दकक्रियां । त्यक्तंसंन्यासयोगेन ग्रहधर्मादिजं व्रतम् ॥ दण्डं प्रदर्शयेद्भिक्षुर्गयां गत्वा न पिण्डदः॥