पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ५ श्राद्ध व त्याचा दायाशी संबंध. १३३ एकाच्या उद्देशानें एकपिण्डयुक्त केलेले जे श्राद्ध त्याला एकोद्दिष्ट ह्मणतात. पुत्रजन्म, विवाह इत्यादि स्थलीं जे श्राद्ध करतात तें नान्दीश्राद्ध होय. यालाच ज्या कृत्याच्या अनुषङ्गानें हें केलें असेल त्याप्रमाणें इष्टिश्राद्ध किंवा वृद्धिश्राद्ध असें ह्मणतात. मर- णाच्या दिवसापासून बाराव्या दिवसापर्यंत जी श्राद्धे करतात ती एकोद्दिष्ट असें ह्म- गतात. बाराव्या दिवशीं अगर पुढे पिण्डसंयोजनरूप में श्राद्ध करितात त्याला स पिण्डीकरण श्राद्ध असें ह्मणतात. बाराव्या दिवसानंतर मृतानिमित्त जीं श्राद्धे होतात त्यांत कांहीं एकोद्दिष्ट व कांहीं पार्वण आहेत. एकोद्दिष्ट श्राद्धे मुख्यत्वेंकरून २९ आहेत. ( १५६. ) श्राद्धकाल व श्राद्धाळा योग्य ब्राह्मण इत्यादि थोडीशी माहिती या ज्ञवल्क्य स्मृतीचं भाषांतर, आचाराध्याय, श्लो. २१७-२६९ ( भा. २ पृ. २३-२८ ) येथे मिळेल. ( १५७. ) श्राद्धाचे अधिकारी कोण व त्यांचा क्रम कसा याबद्दल विस्तर निर्ण- यसिंधु परि. ३ श्रा. प ५५ पृ. ११२, व धर्मसिंधु परि. ३ उ. प. ४ पृ. १ इ. येथे पहावा. 3 ( १५८. ) कोणी श्राद्ध करावें व कोणी करूं नये याचा निर्णय करण्याचा प्रसंग कोर्टे आपल्या योग्य अधिकाराबाहेर न जातील तर केव्हांही यावयांचा नाहीं ह्मणून त्याविषयी विशेष कांही लिहिलें नाहीं. तथापि यासंबंधानें कांही न्यायाधिशांचे व इंग्रजी निबंधकारांचे चुकीचे ग्रह झाल्याचे आढळते ह्मणून कांहीं गोष्टींचें संक्षेपतः वर्णन करितों. ( १५९. ) पहिली गोष्ट ही कीं, कित्येकांचा समज श्राद्धाधिकाऱ्यांच्या क्रमावर रिक्थग्रहणाधिकाऱ्यांचा क्रम अवलंबून आहे असा आहे तो सर्वथा आमच्या इलाख्या पुरता तरी निदान चुकीचा आहे. बंगाल्याकडील ग्रंथकारांनी सपिण्ड यांतील- ३. त्यांतून कांही वचनें उतरून घेत ती :- चन्द्रिकायां सुमन्तुः । मातुः पितुः प्रकुर्वीत संस्थितस्यौरसः सुतः । पैतृमेधिकसंस्कारं मंत्रपूर्वकमादृतः ॥ तत्रैवहेमाद्रौ शंखः । पितुः पुत्रेण कर्तव्या पिण्डदानोदकक्रिया | पुत्राभावे तु पत्नी स्यात् तदभावे तु सोंदरः ॥ स्मृतिसंग्रहे । पुत्रः पौत्रश्च तत्पुत्रः पुत्रिकापुत्र एवच । पत्नीभ्राता च तज्जश्च पिता माता स्नुषा तथा ॥ भागनी भागिनेयश्च सपिण्ड: सोदकस्तथा । असन्निधाने पूर्वेषामुत्तरे पिण्डदाः स्मृताः ॥ विष्णुपुराणे–पुत्रः पौत्रः प्रपौत्रो वा भ्राता वा भ्रातृसंततिः । सपिण्डसंततिर्वापि क्रिया नृप जायते ॥ तेषामभावे सर्वेषां समानोदकसंततिः । मातृपक्षसपिण्डेन संब- न्धो योजनेन वा ॥ कुलह्वयेपि चोच्छिन्ने स्त्रीभिः कार्या क्रिया नृप । तत्संघातगतैर्वापि तद्रिक्थात्कारयेनृपइति.