पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवें. श्राद्ध व त्याचा दायाशी संबंध. ( १५३. ) दाय आणि श्राद्ध यांचा संबंध आलीकडे कोर्टाच्या फैसल्यांत ब प्याच वेळां आढळतो. तो संबंध वास्तविक कसा आहे व श्राद्धादिकांच्या संबंधे केलेल्या खर्चाचा बोजा कुटुंबाच्या इस्टेटीवर किती व कसा पडेल या गोष्टीचें दिदर्शन करण्या- घ्या इराद्यानें प्रथम श्राद्ध ह्मणजे काय, त्याचे किती प्रकार आहेत, ते करण्याचे अधि- कारी कोण इत्यादिकांविषयी थोडीशी माहिती देतों. 9 ( १५४. ) श्राद्ध ह्मणजे मृत पित्रादिकांच्या उद्देशानें शास्त्रविहित काली व देशांत पक्वान्न, आमान्न, व हिरण्य यांतून एकाचें विधिपूर्वक व श्रद्धापूर्वक दान होय.' श्राद्धांत अग्नौकरण, पिण्डदान, व ब्राह्मणभोजन ह्या गोष्टी प्रधान मानिलेल्या आहेत. अनुकूल नसल्याने किंवा काही ठिकाणी वचनचलाने यांतील एकादी गोष्ट न घडल्यास श्राद्धत्वाची हानि होते असे नाहीं. २ ( १५५. ) श्राद्धाचे मुख्य प्रकार दोन (१) पार्वण, व (२) एकोद्दिष्ट. निर्ण- यसिन्धुकार आणि धर्मसिन्धुकार यांनीं, पार्वणश्राद्धांतर्गत नान्दीश्राद्ध ह्मणून एक प्रकार आहे तो दर्शादिकांपासून पुष्कळ भिन्न धर्मांचा आहे ह्मणून त्याचें पृथग्गणन केले आहे व त्याप्रमाणेच पार्पण व एकोद्दिष्ट या उभयतांच्या विकाररूपी असे सपिण्डीकरणश्राद्ध आहे त्याचेंही पृथग्गणन केले आहे. मिळून श्राद्ध चतुर्विध मानून पार्वणश्राद्ध, एकोद्दिष्ट- श्राद्ध, नान्दीश्राद्ध व सपिण्डीकरणश्राद्ध असे चार भेद कल्पिले आहेत. या चार भेदांचे पोटभेद धर्मसिन्धु परि. ३ उ. प. ७ पृ. २ येथे पहावे. महालयश्राद्ध व तीर्थश्राद्ध हीं पार्वणश्राद्ध व एकोद्दिष्ट या उभयतांचे विकार आहेत. पार्वणश्राद्धे एकंदर ९६ आहेत. पित्रादिक त्रयीच्या उद्देशानें पिण्डत्रययुक्त केलेले जें श्राद्ध तें पार्वणश्राद्ध होय. १. पाहा धर्म. परि. ३ उ. प. ७ पृ. १; निर्णय. परि. ३ श्रा. प. १ पृ. १. २. धर्मासिंधूंत ( परि. ३ उ. प. ७ पृ. १ ) खाली लिहिलेल्या पंक्ति आहेतः— तदुक्तं होमश्च पिण्डदानंच तथा ब्राह्मणभोजनम् । श्राद्धशब्दाभिधेये स्यादेकस्मि- न्नौपचारिकम् || क्वचिद्वचनादशक्त्या वा पिण्डदानाद्यकरणे ब्राह्मणभोजनादिमात्रमपि श्राद्ध पदार्थः संपद्यते तथाच वचनान्तरं यजुषां पिण्डदानं बहूवृचानां द्विजार्चनम् । श्राद्ध- शब्दाभिधेयं स्याहुभयं सामवेदिनाम् ॥