पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सापिण्ड्यनिर्णय. १३१ ३२ (१५१.) कोष्टक पाहतां असे दिसेल की, एकंदर वारस ५७ दर्शविले आहेत त्यांपैकी स्त्रिया, व दौहित्र, असे जे वचनानें अधिकारी झाले त्यांची संख्या वजा करतां, ४८ गोत्रज ---सपिण्ड ह्मणून राहतात. त्यांपैकी नंबर १० पर्यन्त क्रम याज्ञवल्क्य वचनानेंच काईम केला आहे. याला बद्धक्रम ह्मणण्याची चाल आहे. नंबर ११ पासून नंबर १८ पर्यन्त क्रम विज्ञानेश्वरानें मिताक्षरेंत दिला आहे. नंबर १९ पासून नंबर ३० पर्यन्त विश्वेश्वरानें सुबोधिनीत काईम केला आहे; व बाकीचा क्रम सदरच्या ग्रन्थ- कारांनी जी दिशा दाखविली आहे त्यावरून मी निश्चित केला आहे. याबद्दल मि. हा- रिंगटन यांणी असा अभिप्राय दर्शविला आहे कीं, प्रथम मयताचा वंश हा सहा पिढ्यां- पर्यन्त नेऊन, नंतर पित्याचा वंश सहा पिढ्यांपर्यंत, नंतर पितामहाचा वंश सहा पिढ्यां- पर्यंत, याप्रमाणे सहाव्या पूर्वजापर्यन्त क्रम असावा. परंतु हा क्रम याज्ञवल्क्याच्या बद्धक्रमालाही बाजूला ठेवतो ह्मणून हा विचार करण्यासारखा दिसत नाहीं. 33 ३४ ३५ ( ११२. ) जस्टिस वेस्ट व बुलर यांच्या ग्रन्थांत असें सांगितलेलें आहे कीं, पिताम- हीच्या पुढे मयताचे प्रपौत्राच्या खालील वंशज व त्यांपुढे पित्याचे पौत्राखालील वंशज घालावे; नंतर पितामह असा क्रम करावा; किंवा पितामहीनंतर पितामहादिक जे सांगितले आहेत त्यांशी पिढ्यांच्या संबंधानें समकक्षेत जे मयताचे व त्याच्या पित्याचे वंशज असतील त्यांना बरोबर वारसा घेण्याचा हक्क द्यावा. पूर्वीचा मार्ग बरा असा त्यांचा अभिप्राय " भासतो. हा क्रम ठरविण्यांत दोन गोष्टी गृहीत दिसतात त्या ह्या कीं, ज्याप्रमाणें पितामहीचें स्थान निश्चित आहे, त्याप्रमाणे पितामहाचें नाहीं; व दुसरी गोष्ट अशी कीं, बद्धक्रमाच्या पुढे क्रम बसविणें तो पूर्वी कोणी ग्रंथकाराने ठर- विलेला नाहीं. ह्या दोनही गोष्टी चुकीच्या दिसतात. विज्ञानेश्वरानें पितामहाचें स्थान स्पष्ट निर्दिष्ट केलें आहे. तें स्थान मनास येईल तो क्रम आतां कल्पून आतां बदलण्यास अधिकार कसा येतो हैं समजत नाहीं. पूर्वी सांगितल्याप्रमाणे नंबर ३० पर्यंत क्रम. विश्वेश्वरानें ठरविला आहे तो बदलण्याचें प्रयोजनही दिसत नाहीं. वरील पूर्वजांचे दोन दोनच वंशज कां घ्यावे याबद्दल कमलाकरानें विवादताण्डवांत स्पष्ट कारण सांगितलें आहे की, याज्ञवल्क्यानें बापाचे वंशज दोनच पिढ्यांचे घेतले, सबव हीच दिशा धरून.. बाकीच्या पूर्वजांचेही तसेच घेतले पाहिजेत. अ प्र० ४ ३२. व्य० श्लो० १३५. ३३. मू० इं० अ० व्हा० २ पा० १३२ (पा० १४९-१६० ) ३४. याविषयीं विशेष पाहाणे असेल तर आमच्या इंग्रजी ग्रन्थांत पा० ३८०-३८३ येथे पहावें ३५. पा० १२४ ( आवृत्ति तिसरी.) ३६. “ तदभावे तयैव दिशा पितामहपितृव्यतत्पुत्रास्तदभावे प्रपितामहीप्रपितामहत- त्पुत्रा इत्येवमासप्तमं सपिण्डास्तदभावे सोदका धनभाज: " असे कमलाकरानें पिताम हीच्या पश्चात् क्रम लिहिते वेळी हाटलें आहे.