पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ हिन्दुधर्मशास्त्र. 93 ( १४१. ) केवल दत्तकाला प्रतिग्रहीत्यांच्या कुळांतील सपिण्डांच्यासंबंधाने मात्र आशौच धरावे लागतें." द्वयामुष्यायणाला उभयकुलांतील सपिण्डांचें धरलें पा- हिजे असे सांगितलेलें आहे; परंतु द्वयामुष्यायण चालू नाहीं तेव्हां त्याच्याबद्दलच्या शा- स्त्रार्थाचा उपयोग आहे असे दिसत नाहीं. श्राद्धासंबंधानें सापिण्ड्यनिर्णय आशौचाप्रमाणेच करावयाचा आहे. दायग्रहणसंबंधीं सापिण्ड्यः हिजेत. ( १४२.) या प्रकरणी जे सपिण्ड व्यावयाचे तेही एका गोत्रांतीलच असले पा- आशौचप्रकरणी जे तीन वर्ग सांगितले आहेत त्यांपैकी दोन वर्ग मात्र या प्रकरणांत घ्यावयाचे. मृतापासून वरील सहा पुरुष पूर्वज, व स्वतःची व सदरील पूर्व- जांची सहा पिढ्यांपर्यंत पुरुषद्वारा पुरुषसंतति, इतके सपिण्ड या नात्यानें वारशास अधि- कारी होतात. भिन्नगोत्र असतां सपिण्ड असे कांहीं वारशास अधिकारी आहेत, परंतु तो त्यांचा अधिकार सपिण्ड या नात्यानें प्राप्त होत नसून विज्ञानेश्वरानें 'बन्धु' पदांत त्या सर्वांचा समावेश केला आहे. १४ सदरचे सपिण्ड कोणत्या क्रमानें अधिकारी होतात तें मी पुढे सांगेन. प्र० ४ ( १४३.) दायग्रहाणाच्या काम स्त्रिया ह्या सपिण्ड या नात्यानें अनधिकारी आ- हेत असा माझ्या बुद्धीचा निश्चय होतो. पत्नी, दुहिता इत्यादिक कांही स्त्रिया सपिण्ड असून दायाधिकारी आहेत इतक्यावरूनच कित्येक असा सिद्धांत करतात की, सर्व सपिण्डांच्या स्त्रियाही सपिण्ड या नात्यानें धनाधिकारी आहेत. परंतु हा सिद्धांत मला अभिमत होत नाहीं; कारण श्रुति, स्मृति, निबंध, व आचार, ही सर्व पाहतां त्यांचा आशय याविरुद्ध आहे असे मला वाटतें. ( १४४. ) तैत्तिरीय यजुर्वेद संहिता काण्ड ६ प्रपाठक १ अनुवाक ७ यांत 'तस्मात्स्त्रियो निरिन्द्रिया अदायादाः' (अर्थ: – ह्मणून स्त्रिया सामर्थ्यरहित व दाय घे- ण्यास अनधिकारी अशा होत ) अर्से श्रुतिवाक्य आहे. हे श्रुतिवचन पुढच्या स्मृति- कारांनी स्मरून ज्या ज्या स्त्रियांस अधिकार आचारानें प्राप्त झाला त्यांचें ग्रहण स्पष्ट निर्देश करून केले आहे. या वचनाचा अर्थ स्त्रिया सोमपानाला अयोग्य आहेत १३. दत्तकचंद्रिका पृ० ५९. १४. पहा मिताक्षरा (व्य० को० १३५-१३६) अ० २ प० ६० पृ० १-सापिण्डाः पितामहादयो धनभाज: भिन्नगोत्राणां सपिण्डानां बन्धुशब्देन ग्रहणात् । अर्थ:-पितामहीच्या अभावी जे सपिण्ड धनाधिकारी सांगितले ते पितामहादिक झणजे समानगोत्रज समजावे, कारण भिन्नगोत्र अशा सपि- ण्डांचे महण बन्धु शब्देकरून केले आहे.