पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सापिण्डयनिर्णय. १२३ ( १३९. ) निर्णयसिंधु असे ह्मणतो की, लग्नाच्या उद्देशानें सापिंण्ड्याचा संकोच ज्या वचनांत निर्दिष्ट आहे, ती वचन द्विजांशिवाय इतरांसच लागू आहेत; द्वि- जांना सार्पण्ड्यसकोच करून विवाह करणे निषिद्ध आहे. ( पहा परि. ३ पूर्वार्ध प. २३ पृ. २ –प. २४ पृ. २. ) संस्कारकौस्तुभांत निर्णयसिन्धूच्या मताचें खण्डन करून व माधवाच्या मतास अनुसरून एक असा साधारण नियम लिहिलेला आहे की, जेथे जेथें देशाचार अथवा कुलाचार असेल तेथें विवाहाच्या उद्देशानें सापिण्ड्य- संकोच करणे रास्त व कायदेशीर आहे. देशचालीने विवाहाच्या नियमांचा इतका संकोच होऊन गेला आहे की, त्या चालीकडे दुर्लक्ष करणे ह्मणजे गैर- शिस्त होईल; कारण ह्या विषयावर जर चाल अगदी सोडून दिली तर दुसरा हिंदु लोकांचा कायदाच नाहीं असें ह्मणण्यास कांहीं भय नाहीं. याविषयी मार्गे विवाह- प्रकरणांत पहावें. प्र० ४ आशौच व श्राद्ध, ह्या दोन्हींसंबंधी सापिण्ड्य १३ ( १४०. ) कुलांत जनन किंवा मरण झाल्यानें सपिण्डांस आशौच झणजे अ- शुचि व किंवा कर्मे करण्याचा अनधिकार येतो. या प्रकरणांत सगोत्र सपिण्ड तेवढेच. सपिण्ड शब्दानं घ्यावयाचे आहेत. सापिण्ड्य पुरुषद्वारा किंवा स्त्रीद्वारा असतें हैं मार्गे सांगितलेच आहे. पुरुषद्वाराच जे सपिण्ड होतात ते एकाच गोत्रांतले अस- तातच. ज्यांचें सापिण्ड्य स्त्रीद्वारा आहे ते भिन्नगोत्र असण्याचा संभव आहे. सबब आशौचाचे अधिकारी जे सपिण्ड होतात त्यांचें सापिण्ड्य पुरुषद्वाराच असतें असें समजावें. यावरून सगोत्रांशिवाय आशौच कोणालाच धरावें लागत नाही असे समजूं नये. कांहीं भिन्नगोत्रांनाही मृताशौच सांगितलेले आहे व ते सपिण्डही आहेत. परंतु त्यांना जें आशौच प्राप्त होते ते त्यांच्या सपिण्डत्वामुळे नसून स्पष्ट वचनांत त्यांची नांवें निर्दिष्ट असल्यामुळे आहे. ह्मणून आशौचप्रकरणी जे सपिण्ड सांगितले आहेत त्यांतून भिन्नगोत्रांचें वर व्यावर्तन केले आहे. जननाशौच भिन्नगोत्रसपिण्डांना केव्हांही नसतें. या प्रकरणाला लागू अशा सपिण्डांचे तीन वर्ग आरंभ करून वरील सहा पुरुष पूर्वज हा पहिला वर्ग होय. सहा पूर्वजांची सहा पिढ्यांपर्यंत पुरुषद्वारा झालेली पुरुषसंतति हा वर्ग दुसरा पहि- ल्या व दुसय्या वर्गातील पुरुषांच्या स्त्रिया व स्वतःची स्त्री हा वर्ग तिसरा. आहेत. पित्यापासून स्वतःची व सदरच्या . १२. 'सगोत्रत्वसमानाधिकरणसापिंडयमेव दशाहाशौचादौ प्रयोजकम्' असे नागोजीभट्ट यांणी सापिंडयप्रदीप ग्रंथांत लिहिले आहे.