पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सापिण्ड्यनिर्णय. १२१ सातव्या पिढीपर्यंत पोंचतो व आईच्या बाजूने पांचव्या पिढीपर्यंत पाँचतो; व दत्तक घे- णाऱ्या पित्याच्या कुळांत बापाच्या व आईच्या दोन्ही बाजूंनी तीन पिढ्यांपर्यंत पोंचतो. दुसरा प्रकार असेल तर दोन्ही कुलांमध्ये सापिण्ड्य संबंध बापाच्या बाजूने पांच पिढ्यांप र्यंत पोंचतो व आईच्या बाजूनें तीन पिढ्यांपर्यंत पोंचतो. तिसरा प्रकार असेल तर दत्तक घेणाऱ्या बापाच्या कुळांत सापिण्ड्य संबंध बापाच्या बाजूने सात पिढ्यांपर्यंत पोचतो; व आईच्या बाजूने पांच पिढ्यांपर्यंत; व जनक पित्याच्या कुळांत आईच्या व बापाच्या दोन्ही बाजूंनीं तीन पिढ्यांपर्यंत पोचतो. प्र० ४ ( १३७.) निर्णयसिंधुकारांचा अभिप्राय असा आहे कीं, दत्तविधान झाल्या- नंतर सापिण्ड्यसंबंध दोन्ही कुळांमध्ये अनुक्रमानें बापाच्या व आईच्या बाजूने सात व पांच पिढ्यापर्यंत पोचतो; परंतु नागोजीभट्टांनी आपल्या सापिण्ड्यप्रदीप ग्रंथांत असे लि- हिलें आहे कीं, दत्तविधान झल्यानंतर जनक पित्याच्या कुलाशीं दत्तक दिलेल्या मुलाचा सापिण्ड्यसंबंध मुळींच राहत नाहीं. यासंबंधानें नागोजीभट्टांचा लेख' विचार करण्याजोगा आहे व त्याला व्यवहारमयूख अनुकूल आहे. त्याचा भावार्थ असा की, मनुवचनांत (अ० ९ श्लो० २४२) गोत्र, रिक्थ व विण्ड इतक्या गोष्टींत जनककुलाशीं दत्तकाचा संबंध तुटतो असे सांगितलेले आहे, तेथें पिण्ड शब्द सापिण्डयपर मानिला पाहिजे, कारण असे नसेल तर सपिण्डांना आशौच प्राप्त अशा स्थळीं दत्तकाच्यासंबंधानें जननाशौच किंवा मृताशौच प्रतिग्रहर्हातृकुलांत मात्र धरण्याचा सर्वत्र आचार हें कसें ? सदरीं लिहिलेल्या नि- र्णयसिंधु, कौस्तुभ आदिकरून विरुद्ध अभिप्राय देणाऱ्या ग्रंथांचें नागोजीभट्टांनी खण्डन क रून ग्रन्थाच्या अखेरीस लिहिलें आहे तें खालीं उतरतों.' ९. तत्र निरुपाधिकदानाज्जनकगोत्रसापिण्ड्यादिनिवृत्तिः प्रतिग्रहीतृगोत्रसापिण्ड्यदि- प्राप्तिश्च व्याप्यपुत्रत्वविधायकवचनैरेव व्यापकगोत्रसापिण्ड्यस्यापिविधेः गोत्ररिक्थे जनाये- तुर्नभजेद्दत्रिमः सुतः । गोत्ररिक्थानुगः पिण्डो व्यपैति ददतः स्वधा इति मनुक्तेश्च । अत्र पि- ण्डशब्दः सापिण्ड्यपरः अत एव प्रतिग्रहीतृसपिण्डा एव तज्जननादौ दशाहाशौचमनुतिष्ठन्ति । अत एवास्मादेव वचनाद्दत्तकस्य जनकसापिण्ड्यनिवृत्तिरित्यभियुक्तैः सर्वैर्व्याख्यातम् । १०. एतेन शुद्धदत्तस्यप्रतिग्रहीतृकुले त्रिपुरुषसापिण्ड्यं जनककुले तु साप्तपौरुषं तदितिनन्दपॉण्डतोक्तिः उभयकुलेपि साप्तपौरुषमिति च शंकरभट्टकमलाकरभट्टोक्तिः तत्समानान- न्तभट्टोक्तिश्च तत्स्वजनक कुलेसाप्त पौरुषं पालककुले पञ्चमपर्यंतमिति च गोविंदार्णवोक्तिश्चकुल- येपि त्रिपुरुषमिति च भट्टवासुदेवोक्तिश्चेति परास्तमित्यास्तांतावत् ।