पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ४ ( १३४. ) कांहीं असें ह्मणतात की, आईप्रमाणेच सावत्र आईचा सापिंड्य- संबंध पांचव्या पिढीपर्यंत पोचतो; व कांहीं असें ह्मणतात कीं, जीं नातेवाइके वरील वचनांत प्रतिपादित आहेत तेवढ्यांवरच सावत्र आईच्या संबंधानें सापिण्ड्य संबंध पोचतो. या मतान्वयें जरी सावत्र आईच्या भावाबरोबर, तो वर निर्दिष्ट असल्यामुळे लग्न करणें निषिद्ध, तथापि त्या भावाच्या मुलाबरोबर लग्न लावतां येईल अड़ें होतें. बहुतेक ग्रंथकारांची संमति, निदान या इलाख्यांत मान्य अशांची तरी, दुसऱ्या मताच्या तर्फेनें आहे. निर्णयसिन्ध, संस्कारमयूख, धर्मसिन्धु, संस्कारकौस्तुभ, गोपीनाथभट्टी ( संस्कारर- त्नमाला ), हे सर्व पहिला अर्थ मान्य करीत नाहींत. १२० ( १३५. ) पहिल्या अर्थाचा स्वीकार पूर्वेकडील धर्मशास्त्रत्रेत्यांनी केला आहे. मयूव आदिकरून ग्रंथांच्या अनुरोधानें सावत्र आईचे भाऊ व तिच्या बहिणी व तिच्या मुलींचीं मुले हीं विवाहास निषिद्ध आहेत. ह्या निषिद्ध मुली, वर सांगितलेल्या २१२१ संख्येबाहेर आहेत. ( १३६. ) त्याप्रमाणेच वधू किंवा वर दत्तक झाला असेल तेव्हां सापिण्ड्य वर सांगितलेल्या २१२१ संख्येबाहेर विस्तृत होतें. ह्या संबंधानेंही फार मतभेद आहे. सा- पिंडयदीपिकेचा अभिप्राय संस्कारकौस्तुभ ( प० १५ पृ० १ ), गोपीनाथभट्टी, धर्म- सिन्धु (परि० ३ पूर्वार्ध प० १५ पृ० १) आणि यज्ञेश्वरशास्त्री यांची पुत्रकल्पलता स्वीका- रितात. धर्मसिन्ध (परि. ३ भा. १ प. १९पृ. १ ) यांत दिलेला उतारा मी खाली देतो." त्याचा भावार्थ असा आहे कीं, दत्तक मुलास, जनककुल व प्रतिग्रहीत्याचें कुल या उभय कुलांतील सपिण्ड मुली विषाहास निषिद्ध आहेत. कोणत्या पिढीपर्यंत सापिंड्यसंबंध पोंचतो याचा निर्णय खालील मुद्यांवर अवलंबून राहील: ( १ ) दत्तक मुलांचें उपनयन मूळच्या घरीं झालें असून पूर्वीचे सर्व संस्कार मूळच्या घरी झाले होते किंवा कसें, ( २ ) उपनयन वगैरे जातकमापासून सर्व संस्कार दत्तक घेणान्याच्या कुलांत झाले होते किंवा कसें. पहिला प्रकार असेल तर जनकपित्याच्या कुळांत सापिंड्यसंबंध बापाच्या बाजूने ८. धर्मसिंधुः – विवाहे सर्वदत्तकेन जनकपालकयोरुभयोरपि पित्रोर्गोत्रप्रवरसंबं धिनी कन्या वर्जनीया नात्रसाप्त पौरुषं पांचपुरुषमित्येव पुरुषनियमउपलभ्यते । सापिण्ड्यं तु जनकगोत्रेणोपनयने जनकपितृमात्रोः कुले साप्तपुरुषं पांचपुरुषं ग्रहीतृमातृकुले त्रिपुरुषम् ग्रहीतृगोत्रेणोपनयनमात्रे कृते उभयत्र पांचपुरुषपितृकुले मातृकुले तु त्रिपुरुषम् जातक- मयुपनयनान्तसंस्कारे ग्रहीत्रा कृते ग्रहीतृकुले साप्तपुरुषं मातृतः पांचपुरुषं अतोन्यूनं जनककुले कल्प्यम् ।