पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सापिंडयनिर्णय. ११९ ( १३०.) सदरीं लिहिलेल्या कोष्टकांपैकी पहिले व दुसरे कोष्टक यावरून पितृ- द्वारा सापिडण्याने मुली किती वर्ज्य होतात हे समजेल. पहिल्या कोष्टकांत पितृद्वारा सपिण्ड पूर्वजांच्या जोडप्यांची संख्या पित्याचें जोडपें धरून ३२ होते. दुसऱ्या कोष्टकांत येणाऱ्या मुलींची संख्या ६ ३ आहे. ज्याप्रमाणे सदरची ३२ जोडपीं सपिण्ड आहेत, त्याप्रमाणेच जोड- प्यांच्या संततीपैकी सहा पिढ्यांपर्यंत मुलीही सपिण्ड आहेत हे मागें सांगितलेंच आहे.. दर एक जोडप्याच्या संततीपैकी ६३ मुली सापिण्ड्यामुळे वर्ज्य आहेत; तेव्हां ३२ जो- डप्यांच्या एकंदर वर्ज्य मुली ३२x६३ - २०१६ होतात. प्र० ४ ( १३१. ) याप्रमाणेच मातृद्वारा सपिण्ड पूर्वजांची जोडपीं ८ होतात हे तिसऱ्या कोष्टकावरून दिसेल. परंतु त्यांपैकी आईबाप हें जोडपें पहिल्या काष्टकांत गणिलें गेलें आहे ह्मणून तें वजा करितां ७ जोडपी राहतात. या प्रत्येक जोडप्याच्या चार पिढ्यांपर्यंत संततींतील वर्ज्य मुली १५ होतात, हे चवथ्या कोष्टकावरून दिसेल. तेव्हां ७ जोडप्यांच्या संततीपैकीं वर्ज्य मुली १५ × ७ = १०५ झाल्या. हे उघड आहे. ( १३२ . ) पूर्वीच्या २०६६ + १०५ मिळून २१२१ रामवाजपेयी यार्णे दाख- विलेली वेरीज भरते. याच हिशेबानें प्रत्येक वधूला २१२१ मुलगे सापिण्ड्याच्या हरकती- मुळे वर्ज्य होतील. सदरच्या हिशेवाच्या वेळी रामवाजपेयी यांणी असे सांगणे जरूर होतें कीं, वराचा प्रथमच विवाह आहे, प्रत्येक जोडप्याला एकच कन्या व पुत्र उत्पन्न झाला आहे, आणि वधूवरांपैकी कोणी दत्तक झालेला नाहीं, व त्यांना सापत्न माता नाहीत, इतक्या तीन गोष्टी गृहीत धरून हा हिशेब केला आहे. या तीन गृहीत न धरल्या तर रामवाजपेयी यांच्या हिशेबांत सापिंड्यामुळे वर्ज्य अशा काही मुलींचा समावेश या हिशे- बांत झाला नाहीं असें ह्मणावें लागेल व एकंदर वर्ज्य मुलींची संख्या २१२१ पेक्षां जास्त होईल. ( १३३. ) जेव्हां वधु अथवा वर ह्यांपैकी कोणा एकासही सावत्र आई असते अथवा त्या दोघांपैकी कोणा एकास दुसऱ्या कुळांतून दत्तक घेतलेले असते, त्या प्रसंगी सदरीं सांगितलेल्या सपिण्डगणनेहून अधिक विस्तार करावा लागतो. सावत्र आईच्या संबंधानें नियम सुमन्तूने दिलेला आहे तो असा:- पितृपत्न्यः सर्वा मातरः तद्भातरो मातुल: तद्भगिन्यो मातृष्वसारः तहुहितरश्च भगिन्यः तदपत्यानि भागिनेयानि अन्यथा संकरकारिणः स्युरिति । अर्थ: - बापाच्या सर्व बायका आया होतात; त्यांचे माऊ मामा; त्यांच्या बहिणी मावश्या; त्यांच्या मुली, बहिणी; व त्या मुलींची मुले बहिणीची मुले, असे मानले नाही तर संकर होईल. ह्या वचनाचा अर्थ कसा करावा ह्याविषयीं मतभेद आहे.