पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दु धर्मशास्त्र. प्र० ४ ( १२५. ) वर सपिण्डगणना सांगितली या बाहेर सपिण्ड येणार नाहीत. परंतु जेथें जेथें सपिण्ड पद येईल, तेथें तेथें सदरचे सर्व सपिण्ड घ्यावयाचे असे मात्र समजू नय; कारण विवाह, आशौच इत्यादि प्रकरणांत नियमित सपिण्डच घेतले जातात. त्याचें विवरण पुढे दर दर प्रकरणाखाली करीन. ५ ( १२६.) कित्येकांनी सापिण्ड्य, मुख्य व आरोपीत अशा भेदाने दोन प्रकारचें मानिलें आहे. कित्येकांनी साक्षात् अथवा परम्परया अशा भेदाने दोन प्रकारचें मानिलें आहे. आमच्या इलाख्यांत विज्ञानेश्वराला जो संमत पक्ष तो चालू आहे; ह्मणजे देहाव- यव समान असल्यामुळे जो परस्परांचा संबन्ध असतो ते सापिण्डय असे समजले पाहिजे. बंगाल्याकडे पिण्डदानावर सापिण्ड्य अवलम्बून आहे ही गोष्ट कोर्टाचे ठराव वाचणा- ज्यांनी लक्षांत ठेविली पाहिजे. विज्ञानेश्वराच्या मतें भार्याहि भर्त्याची सपिण्ड होते. ती दोघांच्या अवयवांना आधार जो पुत्र त्याच्या द्वारें होते. त्याप्रमाणेच दोन जावा एक- मेकींच्या सपिण्ड होतात. त्या उभयतांला साधारण जो सासरा, त्याचे अवयत्र, त्यांच्या भर्त्याच्या द्वारे त्यांचे अत्रयव धारण करणारे जे पुत्र त्यांच्या ठायीं येतात ह्मणून होतात असे समजावें. ११२ ४ ( १ ). विवाहसापिण्ड्य. ( १२७.) स्मृतिकारांनी सपिण्डेशीं विवाह करूं नये अशी मर्यादा केली आहे. ही मर्यादा कांही अंशीं स्मृतिवचनांनी व आचारानें उल्लंघित झाली आहे. तथापि तिचा अतिक्रम कसा झाला आहे, हे समजण्याला मूळ मर्यादेचें ज्ञान आवश्यक आहे ह्मणून विवाहप्रकरणीं सपिण्ड मोजावयाचे कसे हैं प्रथमतः सांगतो. ( १२८.) वर जे सपिण्डाचें सामान्य लक्षण सांगितले आहे त्यावरून हे व्यक्त झालें आहे की सापिण्ड्याची शंका उत्पन्न होण्यास वधू आणि वर हीं एका मूळ- पुरुषापासून उत्पन्न झालीं असली पाहिजेत. जेथें असा संबंध जोडतां येणार नाही. त्या स्थळीं सापिण्ड्याची शङ्काच राहिली नाहीं. संस्कृत ग्रन्थांत मूळ पुरुषास कूटस्थ ह्मणतात. ज्या वधूवरांचें सापिण्ड्य पाहावयाचे असेल त्यांचा कूटस्थाशी संबंध पितृद्वारा आहे की मातृद्वारा हे प्रथम ठरवावें. उभयतांचा किंवा निदान एकाचा तरी संबंध पितृद्वारा असेल तर वधूवरांस सोडून कूटस्थापर्यंत पिढ्या मोजाव्या, व कूटस्थ हा सहा पिढ्यांत आला, तर तीं वधूवरें परस्परांचीं सपिण्ड आहेत असे समजावें. उभयतांचा संबंध मातृद्वारा जुळत असेल तर कूटस्थ चार पिढ्यांत आली तर उभय- ४. पाहा संस्कारकौस्तुभ प० १७३ पृ० १; ५. मिताक्षरा अ० १ श्लो० ५२ यावरील टीका.