पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सापिण्ड्य निर्णय. १११ सा व. ( ४ ) श्राद्ध. या सर्व प्रकरणांस अनुसरून सापिंड्याचे विवरण करण्यापूर्वी सा- मान्यतः सापिण्ड्य ह्मगजे काय याचा विचार करूं. ग्रन्थकारांनी सापिण्ड्य या श ब्दाची व्याख्या दोन प्रकारांनी केलेली आढळते. पहिल्या व्याख्येप्रमाणे सापिण्ड्य ह्मणजे एका पिण्डदानक्रियेशी संबन्धित्व. या व्याख्येस स्मृतिचंद्रिकाकार, देवण्णभट्ट, अपरार्क, मेधातिथि, माधव, नागोजीभट्ट इत्यादि ग्रन्थकारांची संमति आहे. प्र० ४ दुसऱ्या व्याख्येप्रमाणे सापिण्ड्य या शब्दाचा अर्थ एका पिण्डाशीं ह्मणजे दे- हाशी संबन्ध असा होतो. या व्याख्येस वाचस्पतिमिश्र, शूलपाणि, व विज्ञानेश्वर, आणि मदनरत्न, पारिजात, निर्णयसिन्धु, धर्मसिन्धु व संस्कारकौस्तुभ, या ग्रन्थांचे कर्ते या स र्वांची संमति आहे. या दोनही व्याख्यांत सपिण्ड शब्दानें जेवढ्या व्यक्ति घेतल्या जाव्या त्यापेक्षां अधिक संगृहीत होतात ह्मणून पहिल्या व्याख्येचा संकोच मत्स्य- पुराणांतील खाली लिहिलेल्या' वचनानें करितात; व दुसऱ्या व्याख्येचा संकोच या- ज्ञवल्क्य वचनानें करितात . असा दोनही व्याख्यांचा संकोच केला ह्मणजे दोनही लक्षणें फलाला बऱ्याच अंशीं सारखींच होतात; ह्मणून पिण्ड शब्दाच्या संदिग्धपणामुळे उत्पन्न झालेल्या व्याख्याभेदाचें अधिक विवरण न करितां सपिण्ड ह्मणजे कोणास ह्मणावें हें सांगतों. ज्याचे सपिण्ड गणावयाचे असतील त्याची सहा पिढ्यांपर्यंत संतति हा सपिण्डांतील पाहेला वर्ग होय. पितृद्वारा होणारे सपिण्ड हा वर्ग दुसरा. पित्या- पासून आरंभ करून सहा पिढ्यांपर्यंत पूर्वज व त्या प्रत्येक पूर्वजांची सहा पिढ्यांपर्यंत संतति हे दुसऱ्या वर्गांतील सपिण्ड होत. मातृद्वारा होणारे सपिण्ड हा वर्ग तिसरा. मातेचे तीन पूर्वज व त्या प्रत्येक पूर्वजांची चार पिढ्यांपर्यंत संतति हे तिसऱ्या वर्गी- तोल सपिण्ड होत. संतति शब्दानें पुत्र आणि कन्या यां उभयतांचा, आणि पूर्वज शब्दानें पुरुष व स्त्री या उभयतांचा समावेश वर केला आहे हे लक्षांत ठेविलें पाहिजे. १. पहा निर्णयसिंधु परि. ३ पूर्वार्ष प. २२ पृ. २. २. लेपॅभाजश्चतुर्थाद्याः पित्रांद्याः पिण्डभागिनः । पिण्डदःसप्तमस्तेषां सापिडयंसाप्त- पौरुषम् || पाहा निर्णयासंधु परि० 3 पूर्वार्ध प० २२ पृ० २ ३. आचाराध्याय श्लो० ५३ उत्तरार्ध पाहा.