पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चौथें. सापिण्ड्य निर्णय.. ( १२२. ) हिंदुधर्मशास्त्रावर इंग्रेजी ग्रंथकारांनी जे ग्रंथ लिहिले आहेत, त्या सर्वोत सापिण्ड्य निर्णय या विषयाचे विवेचन जितक्या विस्तराने असावें तितकें आ- ढळत नाहीं. पूर्वी इंग्रजी न्यायाधीशांस हिंदूंचे न्याय हिंदुशास्त्राप्रमाणे करतां यावे ह्मणून शास्त्री लोकांची मदत दिलेली होती, व प्रत्येक कोर्टास एक एक शास्त्री जोडलेला असे, आणि पुराव्यानें कोर्टासमोर आलेली हककित थोडक्यांत त्यांच्यापुढे ठेऊन नि काल कसा करावा याबद्दल प्रश्न विचारीत असत व त्यांणी आधारासहित दिलेल्या उ-- त्तरांच्या अन्वयें निकाल करीत असत. शास्त्री लोकांस प्रश्न विचारण्याच्या कामी व फैसले देण्याच्या कामी न्यायाधीशाला मदत व्हावी ह्मणून सरकाराने व्यवहारप्रकर-- णाच्या कांहीं भागांचे तर्जुमे करविले. तरीही शास्त्री लोक सदर अदालती मोडतपर्यंत ठेविलेले होते. ते होते तेथपर्यंत आचार, व्यवहार, प्रायश्चित्त, या तीनही प्रकरणांवरील ग्रंथांचे व देशरिवाजांचे ते अभिज्ञ असल्यामुळे, न्यायाच्या कामी घोंटाळा कमी होत असे असें दिसतें; परंतु हाय कोर्टे झाल्यापासून शास्त्री लोकांच्या जागा कमी केल्या अ सल्यामुळे, एतद्देशीय भाषा व रिवाज यांचे तारतम्यानें तितके अभिज्ञ नाहीत अशा न्यायाधीशांना, जे तर्जुमे झाले आहेत त्यांवांचून हिंदुधर्मशास्त्र संबंधी विवाद ज्या कज्यांत आहेत त्या कज्यांत कांहींच साधन राहिलें, नाहीं. तेव्हां जेवढे तरजुमे आप- ल्यापुढे आहेत तेवढेच कायतें हिंदुधर्मशास्त्र अशी न्यायाधीशांची बुद्धि होणें यांत विशेष आश्चर्य नाहीं. मात्र या समजाचा परिणाम सांप्रत लोकांना भोगावा लागत आहे, ही दुःखाची गोष्ट आहे; आणि तें प्रो. गोल्डस्टकर यांनीं बरेंच दाखविले आहे. ( १२३. ) सापिण्ड्यनिर्णय हा आमचे ग्रंथकार आचारप्रकरणी करितात. जे तरजुमे कोर्टासमोर असतात ते व्यवहारप्रकरणाच्या फार थोड्या भागांचे आहेत; ह्मणून . सापिण्ड्याच्या संबंधीं विवादाचे कज्जे जेव्हां येतात तेव्हां अडचण पडते; आणि वारशाच्या कामांत ह्या प्रकरणाचा फार उपयोग आहे हे जाणून हा विषय मी बन्या- च विस्तारानें येथे लिहिण्याचें मनांत आणिलें आहे. ( १२४.) हिंदुधर्मशास्त्रांतील चार प्रकरणांच्या संबंधाने सापिंड्यनिर्णयाची जरूरी लागते, ती प्रकरणे:-( १ ) विवाह, ( २ ) आशौच, ( ३ ) दायग्रहण ह्म० वार-