पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ३ दत्तकप्रकरण. १६१ 939 १३२ १३४ झाले असे मानितात; मग बाका विधि नसल्यासही बाघ येत नाहीं. मात्र दान व प्र- तिग्रह हीं झालींच पाहिजेत. " होमही झाला पाहिजे, असे कोणी ह्मणतात, परंतु तो न झाल्यानें दत्तविधान रद्द होईल असे दिसत नाहीं. मद्रास इलाख्यांत क्षत्रिय जातींत होम वगैरेची जरूरी नाहीं. तसेंच सगोत्र ब्राह्मणांत देखील नाहीं. परंतु मद्रास हा- यकोर्टात मतभेद आहे. वेंकट वि. सुभद्रा इं. ला. रि. ७ मं. १४८ ह्यांत पाहिजे असें ह्मटलेलें आहे, परंतु गोविंद अयर वि. दोरास्वामी. इं. ला. रि. ११ म. ५ ह्यांत विरुद्ध ठराव झाला आहे. मुंबई हायकोर्टानें रावजी दि. लक्ष्मीचाई इं. ला. रि. १२ मुं. ३८१ ह्मा मुकदम्यांत ब्राह्मणांत दत्तहोम अवश्य आहे असें जोर देऊन ह्मटलें आहे. हा कज्जा सोनारांत होता. दान आणि प्रतिग्रह हीं मात्र प्रत्यक्ष झाली पाहिजेत. तुह्मी आपला मुलगा आह्मांस द्याल काय ? अर्से घेणारा ह्मणाला; देऊं असे देणारा ह्मणाला; परंतु प्रत्यक्ष दान व प्रतिग्रह झाली नाहीत, ह्मणून ते दत्तविधान झाले नाहीं असें ठरले आहे. १३५ ( ११३.) दत्तंविधानप्रसंगी बंधूस बोलावून, आणि मध्ये राजास कळवावें, असें सागितलेलें आहे याचें कारण विधि प्रसिद्ध होऊन सुढे तंटा पडूं नये हे आहे. याविषयीं वीरमित्रोदयकर्ता ह्मणतोः = “ देयोक्तिप्रसंगेन प्रतिग्रहे प्रकारविशेषं दर्शयति याज्ञवल्क्यः ॥ प्रतिग्रहः प्रकाशः स्यात् स्थावरस्य विशेषत इति । प्रकाशः प्रकटः ससाक्षिक इति यावत् ॥ पुत्रप्रतिग्रहे प्र- कारविशेष उक्तो वसिष्ठेनः— पुत्रं ग्रहीष्यन् बन्धून् आहूय राजनिचावेद्य निवेशनस्य मध्ये व्याहृतिभिर्हुत्वा, अदूरबान्धवम् सन्निकृष्टमेव गृहीयात् इति अर्थः-देय " १३६ १३०. नागोजीभट्टकृत सापिण्डयप्रदीप पहा; मनु, अ० ९ श्लो० १६८ व त्यावरील कुल्लूकमट्टाची टीका; मार्लिस डैजेस्ट, वा० १ पृ० १९, क० ६८. १३१. महाशय शशिनाथ वि० श्रीमतिकृष्ण ७ इं० अ० २५० इं० ला० रि० ६ क० ३८१; रंगन्नाय कम्मा वि० अलवारचेंटी इं० ला० रि० १३ म० २१४. १३२. वरील टीपेंतील आधार, व शिवाय मार्लिस डैजेस्ट वा० १, पृ० २० व २१ क० ७६ व ७७. १३३. चंद्रमाला वि० मुक्तमाला इं० ला० रि० ६ म० २०. १३४. आत्माराम वि. माधवराव इं० ला० रि० ६ अ० २७६. १३५. मुंबई हायकोर्टाचा ठराव, स्पे० अ० नं० ६४५ स० १८६६, ता० २२ एप्रील १८६७. १३६. याविषयी याज्ञवल्क्यवचन – “प्रतिग्रहः प्रकाश: स्यात् स्थावरस्य विशेषतः " अर्थ:- प्रतिग्रह करणें तो उघडपणे करावा; त्यांतही स्थावराचा विशेषेकरून. यावर विज्ञानेश्वर ह्मणतो:-. " प्रतिग्रहणम् प्रतिग्रहः सः प्रकाशः कर्तव्यः विवादनिराकरणार्थम् || स्थावरस्य च विशेषतः प्र- काशमेव प्रहणं कार्यम् ॥ तस्य सुवर्णादिवत् आत्मनि स्थितस्य दर्शयितुमशक्यत्वात् " अर्थः- " प्रतिग्रह करणे तर पुढे विवाद न पडावा एतदर्थ प्रसिद्धपणे करावा; त्यांत स्थावराचा प्रतिग्रह तर विशेषेकरून प्र सिद्धपर्णेच करावा, कारण जसें सुवर्णादिक आपल्याजवळ असलेले (हे माझें आहे असें) दाखवितां येतें तसें स्थावर दाखवितां येत नाहीं, "