पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ३ दत्तकप्रकरण. १०१ १२. मागण्याचा अधिकार आहे इतकेंच ठरविलेले आहे. हा अधिकार दत्तक पुत्रास प्राप्त होण्यास इतक्या आडव्या मार्गाने जाण्याचे कारण नाहीं. विधवेच्या मागून रिक्थ घेणाऱ्या सर्वांस तिनें केलेली व्यवस्था तपासण्याचा अधिकार आहे. त्याच अधिकारानें दत्तकही तो तपास करूं शकेल. एका कज्यांत तेवढ्या वंशजाचें धन वारशानें मि- ळण्याचा वेळ आला त्यावेळी दत्तक झालेला असता तर तो धनाधिकारी झाला असता, परंतु तो नव्हता ह्मणून धन दुसऱ्याने घेतलें. नंतर झालेल्या दत्तकानें तें धन परत मिळण्याचा दावा आणिला. अशा दाव्यास सदरची कल्पना आधारभूत होईल, परंतु कोटीनें ठरविलें कीं, वारसा परत मिळणार नाहीं . . हा ठराव बरोबर दिसतो. एका मुलीचा दत्तक मुलगा दुसऱ्या मुलीच्या औरस मुलाबरोबर समान अधिकाराने आपल्या आजाच्या इस्टेटीचा वारस होतो.' एका विधवेनें मुलगा दत्तक घेतला. नंतर त्या मुलानें दत्तविधानाच्या पूर्वी तिनें केलेली इस्टेटीची घालमेल रद्द करावी ह्मणून दावा आ- णला. मुंबई हायकोर्टानें दावा चालतो असा ठराव केला. २२ दत्तक पुत्र याजकडे तेदा वारसा येतो ह्या न्यायानें सख्ख्या भावाचा दत्तक मुलगा ह्याचा सावत्र भावांच्या मुलां- पेक्षां अधिक मजबूत वारसा आहे असे शंभुचंदर वि० नारायणदिवे, न्याप्स रि. पदुकुमारि वि० जगत्किशोर, इं. ला. रि. कल. व्हा. ५, १२१ व्हा. ३ पृ. ५५, पु. ६१५, व दीनानाथ मुकरजी वि० गोपाळचरण मुकरजी, क. रि. व्हा. ८ पृ० १७, ह्यांत ठरले आहे. तसेंच औरस व दत्तक यांमध्ये कांहीं भेद नाहीं ह्मणून घेणाऱ्या आईचे संबंधी लोकांचा वारसाही त्याला पोंचतो; आणि ह्मणूनच तो मामाचाही वारस होतो, असे उमाशंकर वि० काळीकोमा, इं. ला. रि. क. व्हा. ६ पृ. २५६ फुल बेंच ह्यांत, व घेणाऱ्या बापाच्या कुटुंबांतील तीन पिढ्यांच्या मागीलही वारसा त्यास पोंचतो असें मुकुंदलालराय वि० वैकुंठनाथराय, इं. ला. रि. क. व्हा. ६ पृ. २८९ ह्यांत ठरलें आहे. दत्तकाचें स्वरूप. ( ११०.) दत्तविधानानें जनक मातापित्यांचें मुलावरील स्वत्व जाऊन घेणाऱ्या मातापित्यांचें येतें. दत्तक केवळ व व्यामुष्यायण असा दोन प्रकारचा आहे असे म १२० इं० ला० रि० क० व्हा० २ पा० २९५. १२२. सूर्यकान्त वि० मद्देश इं. ला. रि. ९ क. ७०, तिच्या बापाकडून तिला आलेल्या धनाचा तो बारस होतो इं. ला. रि. १ अ २५५. १२२. लक्ष्मण वि० राधाबाई ई० ला० रि० ११ मुं. ६०९.