पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ हिन्दुधर्मशास्त्र. प्र० ३ पुत्र देण्याचा अधिकार नाहीं सवत्र तिर्णे देऊन झालेलें• दत्तावधान रद्द असे एका जड्- जानें ठरविले आहे. परंतु त्या कज्यांत दत्तक एकुलता होता असा पुरावाच नव्हता सबब सदरचा ठराव हा केवळ अभिप्राय समजला पाहिजे. परंतु घेतां येत नाहीं असा एक नवीन फुल बेंचाचा ठराव झाला आहे." अलहाबाद हायकोर्टाचे फुल बेंचाचे ठराव असा दत्तक चालतो असे झाले आहेत" व मद्रासचाही एक ठराव झाला आहे" तेच ग्रंथ व आचार यांस अनुसरून आमच्या इलाख्यांत मानण्याजोगे आहेत असा माझा अ भिप्राय आहे, व तो विज्ञानेश्वर,' श्रीनाथभट्ट, व जगन्नाथ यांच्या अभिप्रायास अनुसरून आहे. श्रीनाथभट्टांनी दत्तकनिर्णय नामक ग्रंथांत लिहिले आहे की, " एक- पुत्रदाननिषेधो दूरदृष्टज्ञापनार्थ न तु दानासिद्धयर्थम् " ह्मणजे एकपुत्रदानाचा नि- षेध झालेले दान रद्द करणारा नव्हे, देणें पारलौकिकसंबंधानें अप्रशस्त इतकेंच सांग- णारा आहे. १०१ 66

१०3

( १०७. ) एकदां सविधि कृत्य झालें ह्मणजे रद्द होऊं शकत नाहीं असा ९७. वामन वि. कृष्णाजी इं. ला. रि, १४ मुं. २४९. ९८. हनुमान वि. चिराई इं. ला. रि. अला. हा. २ पा. १६४; वेणीप्रसाद वि. हरदेवबिबी, इं, का.रि. १४ अ. ६७. ९९. नारायणस्वामी वि. कुप्पुस्वामी इं. ला. रि. ११.म. ४३. १००. साताऱ्याचे महाराज छत्रपति प्रतापसिंह यांचे पुत्र शहाजी हे एकळते असून दत्तक झाले. तसेच हल्लींचे कोल्हापूरचे महाराज शिवाजी छत्रपति. यांचे वडील राजाराम महाराज हेही एकुलते दत्तक असून बहिणीचा मुलगा अशासंबंधाचे होते. त्यांच्या जनक पित्यानें इंग्रज सरकारच्या परवा- नगीनें दत्तक घेतला. सासवडचे पुरंदरे, बहिरोपंतं पिंगळे, भोरचे सचिव, बावडेकर पंत अमात्य, गो- पाळराव मैराळ यांच्या घराण्यांत अशी प्रसिद्ध उदाहरणे आहेत व अन्यत्नही सर्व वर्णीत अर्शी उदाहरणे आहेत. हल्लीं कोल्हापुरास रीजंट नेमिले आहेत हे एकुलते असतांच कागल संस्थानांत दत्तक झाले व मंतर त्यांच्या जनक पित्यास पुत्र झाला. हा आचार आमच्या इलाख्यांत अमुकच प्रांती किंवा जातींत आहे असे नसून सर्वत्र आढळतो. या चालीचा पुरावा करावयाचा असल्यास कांहीं कठिण पडणार नाहीं; व ग्रंथांचे व फैसल्यांचेही यास आधार आहेत. , १०१. मिताक्षरा व्य• श्लो० १३० वरील टीका. १०२. कोलनककृत तरजुमा व्हा० ३ पा० ३८७-३८८. १०३. भाग २ पृ० १६३. . १० निर्णयसिन्धु परि० ३ पू० प० ९ १० २; जीमूतवाहन दायभाग पृ० ६०; सरं टा. स्ट्रेंज व्हा० १ पा० ८७; व्हा० २ पा० १२६; स्टील पा० ५३; स० वी० रि० १९ पृ० १३३; ह्यासंबंधाची तत्वें गंगासाह्रै वि० लेखराजसिंह ( इं० ला० रि० ९ अ० २२९ ) ह्यांत सां-