पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हिन्दुधर्मशास्त्र.. प्र० ३ ळकतीचा सर्व अधिकार पोचतो किंवा कसा याविषयी आपण शास्त्रविचार करून शा- स्त्रांतील वाक्यसहित लिहून देऊन याखाली आपली संमति करून दिली पाहिजे. क ळावें, मिती मार्गशीर्ष शुद्ध २ बुधवार शके १७७६ आनंदनाम संवत्सरे तारीख २ नोवें- बर सन १८५४ इसवी. बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विनंति. २ सही, नारायणराव रामचंद्र चोभे दस्तुर खुद्द .. . उत्तर. दत्तपुत्र घेणें, तो सगोत्र सपिंड घ्यावा. त्यांत भावाचा मुलगा घ्यावा हा मुख्य पक्ष आहे. त्याप्रमाणे हे दत्तविधान झाले. तो दत्तभावाचे मुलाप्रमाणेच आहे व पूर्वसंबंधानें पाहतां कनिष्ठ भ्राता आहे. तोही पुत्रतुल्य आहे. यावरून पाहतां हे दत्तविधान शास्त्राप्रमाणें झालें आहे. यास बाघ नाहीं. यथाशास्त्र झालेले दत्तविधान फिरणार नाहीं.. .जो दत्तपुत्र झाला तो स्थावरजंगमाविषयी मालक होईल. अत्र प्रमाणम्. दत्तकपुत्रग्रहणे भ्रातृपुत्रः प्रथमः भ्रातृणामेकजातानां यद्येकः पुत्रवान् भवेत् । स- र्वे ते तेन पुत्रेण पुत्रिणो मनुरब्रवीदित्यादिवचनात् ॥ तदनन्तरं सगोत्रसपिण्डः || ब्राह्मणानां सपिण्डेषु कर्त्तव्यः पुत्रसंग्रह इत्यादिवचनात् ॥ सगोत्रसपिण्डान्तर्गतः कनिष्ठभ्रातापि ग्रह- णयोग्यः । ज्येष्ठो भ्राता पितुः समइत्यादिदचनेभ्यः कनिष्ठभ्रातुः पुत्रसमत्वात् भ्रातुः पुत्रवत् ॥ ज्येष्ठ भ्राता तु पितृसमत्वात् ग्रहणयोग्यो न भवति ॥ कनिष्ठभ्रातुस्तु दत्तकत्वेन ग्रहणे मयूख- मिताक्षरादिग्रन्थेषु बाधकं स्मृतिवचनं नोक्तं ॥ किंच ॥ प्रकृतोदाहरणे ज्येष्ठभ्रातुः दत्तक- त्वात् पूर्वभ्रातृसंबन्धस्य निवृत्तेः इदानीं भ्रातृपुत्रसमत्वात् इतरसपिण्डवत् पूर्वकनिष्ठभ्रातुर्द- त्तकत्वेन ग्रहणं सुतरां घटते ॥ सच दत्तकः सकलस्थावरजङ्गमात्मकधनस्वामित्वं लभते ॥ अत्रार्थे संमतयः १ त्र्यंबकशास्त्री शालिग्राम स्वाक्षर. १ नीलकंठशास्त्री भट स्वाक्षर. १ शंकर जोशी व्यवहारे स्वदस्तुर. १ महादेवशास्त्री गडबोले स्वदस्तुर. १ भिकुशास्त्री गोडबोले दस्तुरखुद्द. १ जनार्दनाचार्य वळे दस्तुरखुद्द. १ गोपीनाथ शास्त्री आगाशे हस्ताक्षर खुद्द. घोंडशास्त्री डेंग्वेकर हस्ताक्षर खुद्द. १ गणेशशास्त्री वाळवे दस्तुरखुद्द. १ नरसिंहाचार्य ओक दस्तुरखुद्द.