पान:हिन्दुधर्मशास्त्र भाग १ व २.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्र० ३ दत्तकप्रकरण. ८८ परंतु तिचें कारण या विषयावरील इंग्रजी ग्रंथ व त्या ग्रंथानुसार कोर्टाचे ठराव यांशिवाय तशी हरकत घेण्यास कांहीं आधार नाहीं. मि. स्टील याणे आपल्या ग्रंथांत अशा दत्त- काची उदाहरणें दिली आहेत" व मि. नेल्सन याणेंही दिली आहेत. “ स. १८५६ साली पुणे एथें शास्त्रिमंडलास एकानें याच विषयावर प्रश्न केला व नामांकित शास्त्रि- लोकांनी अशा दत्तविधानाला अनुकूल असा जबाब दिला. तो कागद मला उपलब्ध झाला तो लोकांच्या माहितीसाठी एथें देतो:- 66 'वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री पुणेकर शास्त्री मंडळी यांस पोष्य नारायणराव • रामचंद्र चोने वस्ती शहर पुणे पेठ कसचा कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति विशेष. आमचे आजे बाळाजी सिद्धेश्वर हे (ह्यांनी ) काशी बिन सोनकोपत चोभे यांणी ( ऊर्फ ) काशी रघुनाथ चोभे हे सोनकोपंताचे ज्येष्ठ चिरंजीव, दादोपंताचे नातू हे चुल- त पुतणे. यांचा ज्येष्ठ चिरंजीव यास मौंजीबंधन झाल्यावर दत्तविधान करून घेतले त्यास नांव रामचंद्रराव. त्याचे विवाहादिक नंतर झाले. ते शके १७७४ भाद्रपद वद्य १४ रोजीं मृत्यु पावले. त्यांणीं दत्त पुत्र घेण्याविषयीं आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांची वडील स्त्री जानकीबाई भ्रतार रामचंद्र बल्लाळ यांणी आश्विन वद्य ९ शनवार रोजी काशी रघुनाथ चोभे यांचे कनिष्ठ चिरंजीव आह्मी नारायण यास दत्तक विधिपूर्वक घेतले. त्यांस. रामचंद्र- रात्र काशी रघुनाथ याचे ज्येष्ठ चिरंजीव बाळाजी सिद्धेश्वर यांस दत्तक दिलें, तेव्हां राम- चंद्र बल्लाळ व काशी रघुनाथ यांचें बंधूचे नाते जाहले. हल्लीं आह्मांस दत्तक घेतलें तेव्हां आह्मी जानकीबाईचे पुतणे होत आहों. पूर्वीचे घरचे रामचंद्रराव दत्तक झाल्यानंतर आमचा जन्म झाला, तेव्हां बंधुत्वाचें नातें मुळींच राहिलें नाहीं असा मजकूर तेव्हां आलीं रामचंद्र बल्लाळ यांचे वारस पुत्र शास्त्राप्रमाणे झालों, या कारणास्तव मेहेरबान जड्ज साहेब बहादुर जिल्हा पुणे यांचें वारसाचें सरटिफिकिट मिळावें या बाबत जानकीबाई यांच्या कनिष्ठ सवती मथुराबाई व लक्ष्मीबाई आहेत, त्या दोघी यांणी आह्मांविषयीं कबुलातीचे अर्ज साहेबांस केले आहेत. त्यांस पूर्वीचे घरचे बंधु असे दत्तक पूर्वी व हल्लीं, नानासाहेब सचीव यांणी वामनराव रावसाहेबांस दत्तक घेतलें होतें. आबासाहेब पुरंदरे यांनी माधवराव नीलकंठ पुरंदरे यांस दत्तक घेतलें. ते हल्लीं असून त्यांस सरकारांतून जहागिरी चालत आहे. व तात्यासाहेब चंद्रचूड यांची वडील स्त्री यशोदाबाई यांनी यशवंतराव यांस दत्तक घेतले. त्या कामांत शास्त्राचा विचारही झाला आहे. त्यास असे दत्तक झाले असतां त्याजविषयीं शास्त्रांत विरुद्ध आहे किंवा कसें, व दत्तक झाला तो व तें विधान फिरेल किंवा कसें, व दत्तकास स्थावर जंगम मि- व ८७. पा० ५१. ८८. पा० ९०.