पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/96

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८३

कित्येक ठिकाणी आजूबाजूस कोठे उंच प्रदेश नसून एकाद्या उंच जागेवर झरा आढळतो; याचे कारण असे की, जवळपास उंच प्रदेश नसला, तरी तो दूर कोठे तरी असलाच पाहिजे. पाण्याच्या अंगी असा एक धर्म आहे की, ते नेहमी आपली उंची सारख्याच पातळीत ठेविते. म्हणजे एकादा उंच पाण्याचा सांठा बांधून त्यामध्ये पाणी भरून ते नळीने कितीही दूर नेले, तरी त्या सांठ्यांतील पाण्याचे उंची इतके ते उंच चढते.

हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf

बाजूस दाखविलेली

आकृति पहा. अ हे एक मोठे पात्र आहे; ब ही एक वांकडी नळी त्याचे बुडापासून निघून त्याचेच उंची इतकी उंच गेली आहे व तिचे शेवटास फनेल ( नरसाळे ) आहे. आता, या फनेलामधून पाणी घालू लागलों असतां, ब नळींतील पाण्याची उंची व अ भांड्यांतील पाण्याची उंची नेहमी सारखीच राहील. दोन्ही- कडील पात्रांचे आकारमान कितीही लहानमोठं असो; पाणी आपला धर्म सोडीत नाहीं. जमिनीमध्येही वरील पात्राप्रमाणे कांहीं कांहीं ठिकाणी स्थिति असते. म्हणजे अ पात्राप्रमाणे एकादी उंच जमीन असते,व जमिनीच्या पोटांतील खडकाच्या थरांमधील फटी ब नळीप्रमाणे असतात. ह्याकरितां, त्या उंच जमिनीतील पाणी दूर पुनः तितक्याच उंचीवर येऊन वाहू लागते. अशा