पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/89

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७६

विचार केला असतां झाडांची वृद्धि केल्यापासून फारसा फायदा होईल, असे म्हणता येत नाहीं; तथापि, अगदीच होणार नाहीं असे मात्र समजू नये. झाडांपासून थोडी बाष्पोत्पत्ति होतेच, व त्या योगाने अंशतः तरी पावसामध्ये फरक होण्याचा संभव आहे. इतकेच की, दक्षिणेमध्यें झाडे लाविल्यापासून जितका उपयोग होणार आहे तितका तेथे होणार नाहीं.

 दक्षिणेकडील अल्पवृष्टीचे प्रांताची स्वतःसिद्ध रचना अशी कांहीं विलक्षण आहे कीं, एथे झाडे लाविल्यापासून अतोनात फायदा होण्यासारखा आहे. म्हणजे ह्या प्रांताच्या पश्चिमेकडून अरबी समुद्रांतून एकसारखा सपाट्याने वाफेचा पुरवठा होत असतो. त्यामुळे घाटमाथ्यावर तर पावसाची शिकस्तच होते. व पुढे पूर्वेस पर्वताच्या उतरणीवर अधिक वृष्टि होते. याचे पूर्वेस अल्पवृष्टीच्या प्रदेशावरून वाफेचा मोठा प्रवाह एकसारखा वाहात असून पुष्कळ दूर जाऊन पुनः अधिक वृष्टि होते. म्हणजे, उत्तर हिंदुस्तानांतील अल्पवृष्टीच्या प्रदेशाप्रमाणे एथे वाफेचा पुरवठा न संपतां पश्चिम बाजूस पावसाची शिकस्त होत असल्यामुळे वाफेचा पुरवठा साधारण बराच असतो. इतकेच की, तो पावसाचे रूपाने जितका खालीं यावा तितका येत नाहीं; म्हणून ह्या ठिकाणी झाडांची वृद्धि केली असतां तो हेतु साधणार आहे.

 जंगलवृद्धीपासून पावसाचे मान वाढते हा विषय अद्यापपावेतों बराच वादग्रस्त आहे. जंगलापासून पावसाचे मान वाढते हें प्रतिपादन करणारे पुष्कळ विद्वान् व शास्त्रज्ञ लोक आहेत; व फ्रान्स