पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/72

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५९

ऊन पोहोंचतो; आणि सह्याद्रि उल्लंघून जाणारा जो पावसाचा प्रवाह तो घाटावर आल्यावर समोर मद्रासकिनाऱ्यावर जावयाचा तो भागीरथी नदीच्या मैदानांतील पावसाच्या प्रवाहाच्या जोरामुळे उत्तर हिंदुस्तानाकडे वळला जाऊन मद्रासेकडचा किनारा कोरडा राहतो."

 ईशान्येकडील नियतकालिक वारे :--ह्याचप्रमाणे सूर्य कर्क- वृत्तापासून दक्षिणेस मकरवृत्ताकडे जाऊ लागला म्हणजे दक्षिणेकडे उष्णता जास्त होऊ लागते, व तिकडील हवा उष्ण होऊन मागे सांगितल्याप्रमाणे वर जाऊं लागते, व तिच्या जागीं उत्तरेकडील थंड हवा येऊ लागते. पृथ्वीच्या दैनंदिन गतीमुळे उत्तरेकडील हवेस पूर्वेस जाण्याची जी गति प्राप्त झालेली असते ती दक्षिणेकडील म्हणजे विषुववृत्ताकडील हवेच्या गतीपेक्षा कमी असल्या कारणाने ह्या वाऱ्याचे प्रवाहास थेट उत्तरेकडची गति न मिळतां नैर्ऋत्येकडील गति प्राप्त होते. अशा रीतीनें ईशान्येचे बाजूचा वारा वाहू लागतो. ह्यासच ईशान्येकडील नियतकालिक वारा असे म्हणतात.

 हेही वारे पाऊस आणणारे आहेत. पूर्वीच्या नैर्ऋत्येकडील नियतकालिक वाऱ्याबरोबर समुद्राच्या पाण्याची वाफ उत्तरेकडे गेलेली असते, त्यापैकी जी वाफ पर्जन्यरूपानें खालीं न आल्यामुळे शेष राहिली असते ती ह्या वाऱ्याबरोबर परत येऊ लागते. ह्या वाफेस आणखी वाफेचा पुरवठा करण्यास उत्तरेस समुद्र नसल्यामुळे आरंभीं आरंभीं मात्र ह्या वाऱ्यामध्ये वाफ असते व ह्या वाफेपासून