पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



६०

 *मघापंचकाचे वळिवाचे पाऊस सप्टेंबर महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत पडतात. पुढे ही वाफ संपून गेल्यानंतर फक्त कोरडा वारा फार वाहात असतो. ह्या पावसाचे वर्षाचे सरासरी मान ५ पासून २० इंच असते व ह्यावरच रबीची पिके होतात.

 वरील विवेचनावरून वर्षाकाल जून महिन्यापासून आक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत कां असतो हे स्पष्ट झाले.

पर्जन्यवृष्टि

 आतां, हवेमध्ये असलेल्या वाफपासून पाऊस कसा पडतो, ह्याविषयी विचार करूं.

 हवेतील वाफेचे पुनः पाणी होऊन पडणे ह्यास पाऊस म्हणतात. वाफेचें पुनः पाणी कसे होते, हे पुढील वर्णनावरून स्पष्ट कळेल. हवेच्या आंगीं पाण्याची कांहीं एक वाफ अदृश्य रूपाने धरण्याची शक्ति आहे. अमुक हवेमध्ये पाण्याची किती वाफ राहूं शकते याचे प्रमाण हवेच्या उष्णतेवर अवलंबून असते. जसजशी हवेची उष्णता जास्त तसतशी तिजमध्ये वाफ अदृश्य रूपाने राहण्याची शक्ति जास्त. अमुक उष्णतेच्या हवेमध्ये अमुकच वाफ अदृश्य रूपाने राहू शकते, त्यापेक्षा जास्त वाफ तिजमध्ये घालण्याचा प्रयत्न केला असता, ती तिजमध्ये न राहतां, पाण्याचे रूपानें खाली पडते. अशी हवेची स्थिति झाली म्हणजे तीस विरण्याची परमावधि झालेली हवा म्हणतात. परंतु त्याच हवेची उ-

-----

 * मघा नक्षत्र उत्तर हिंदुस्तानांत वळिवाच्या पावसाचे असते; परंतु दक्षिणेस साधारणतः ते झडीच्याच पावसाचे असते.