पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



५८

असते. व ही बाष्पमिश्रित हवा हिंदुस्तान देशांत येऊ लागली म्हणजे मुख्य पावसाळा सुरू होतो. मृगपंचक म्हणून पावसाळ्याचा जो महत्त्वाचा भाग तो हाच होय. ह्या नक्षत्रांमध्ये पडणारे पावसास झडीचा पाऊस म्हणतात. ह्याचे वार्षिक मान इतर पावसांपेक्षां पुष्कळ जास्त असते. परंतु ते निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे आहे. ह्याच पावसावर खरिपाचीं पिकें अवलंबून असतात.

 "अलीकडे पावसाविषयी जे शोध चालले आहेत, त्यांवरून असे आढळते की, आमच्या हिंवाळ्याच्या दिवसांत केप ऑफ गुदहोपाकडे पावसाची सुरुवात होते. तेथून हळू हळू सूर्य जसा हिंदुस्तानाकडे येऊ लागतो तसा हिंदुस्तानचे पश्चिम किनाऱ्यावर एप्रिल महिना संपण्याचे सुमारास येऊन पोहोचतो. परंतु त्या ठिकाणीं सह्याद्रीची रांग मध्ये आड आल्यामुळे थोपून राहतो. आणि त्या पावसाचे लाटेचा एक भाग, त्यास मध्यें आडकाठी नसल्यामुळे बंगालचे उपसागरांत पुढे सरून ब्रह्मदेश व सयाम एथे उंच प्रदेश या लाटेचे आड येतात म्हणून तिचा प्रवाह उत्तरेकडे वळून, बंगाल प्रांतावर येऊन, पुढे हिमालयाचा अडथळा आल्यामुळे, भागीरथीच्या सखल मैदानांतून थेट पेशावरपर्यंत पाऊस पडत जातो. इकडे सह्याद्रीच्या अडथळ्यामुळे अरबी समुद्रामध्ये जो पाऊस थोपून राहिलेला असतो तो मे महिन्याच्या अखेर सह्याद्रीपर्यंत येऊन पोहोचतो. ह्यावरून तुमच्या असे लक्षात येईल की, ज्या वेळेस कोकणांत पावसास आरंभ होतो, त्याच सुमारास बंगालच्या उपसागराचा दुसरा फांटा भागीरथीचे सपाट मैदानांत ये-