पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/63

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५०

ल्यावर, उत्तर गोलार्धात उत्तरेकडे पुनः थोडथोडी उष्णता कमी होऊ लागते, व दक्षिणेस थोडी जास्त होऊ लागते. असाच क्रम दक्षिण गोलार्धात उन्हाळा लागेपर्यंत चालतो; नंतर पुनः हे रहाटगाडगे फिरते.

 वरील क्रम चालू असतांना जेथे जेथे उष्णता जास्त भासमान होत जाते, तेथे तेथे सूर्य डोकीवर येत असतो म्हणजे त्या त्या ठिकाणीं सूर्याची किरणें लंब रेषेने पडत जातात, व रात्रीपेक्षा दिवस मोठे होत जातात. लंब किरण पडल्यामुळे व दिवसरात्री लहानमोठ्या झाल्यामुळे उष्णतेचे मान कमीअधिक कसे होते हें आतां पाहूं.

 लंब किरणांपासून जितकी उष्णता प्राप्त होते, तितकी उष्णता तिर्कस किरणांपासून प्राप्त होत नाहीं. ह्याचे कारण इतकेच की, नियमित लंब किरणें जितकी जागा व्यापितात, त्यापेक्षां तितकीच तिर्कस किरणे जास्त जागा व्यापितात. अर्थात् , नियमित जागेवर कमी किरणे पडल्यामुळे त्या ठिकाणी उष्णताही कमी भासते. सकाळी आठ नऊ वाजण्याच्या वेळी एकाद्या झरोक्यांतून सूर्याची किरणे पडली असतील अशा ठिकाणीं एक लाकडाचा तक्ता अगदी सूर्याचे समोर म्हणजे किरणांशीं काटकोन होईल असा धरावा, आणि तक्त्यावर उष्णता व प्रकाश किती आहे, हे पहावे; नंतर तोच तक्ता ती किरणे जास्त जागा व्यापितील अशा रीतीने तिर्कस धरावा, म्हणजे प्रकाश व उष्णता कमी दिसतील. सकाळीं व संध्याकाळीं आपणांस ऊन कमी लागते व मध्यान्हास फार लागते