पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



५१

ह्याचेही कारण हेच. सकाळी व संध्याकाळी किरणें तिर्कस पडतात ह्यामुळे थोडी किरणें पुष्कळ जागा व्यापितात म्हणून उष्णता कमी असते; व मध्यान्हास किरणें लंब पडतात म्हणून उष्णता अधिक असते.

 अशा रीतीने सूर्याची किरणें कर्कवृत्ताचे उत्तरेस व मकरवृत्ताचे दक्षिणेस लंब रेषेने कधीच पडत नाहींत. आतां, मकरवृत्तावर सूर्याची किरणें लंब रेषेने पडतात असा काल आला आहे असे समजा. हा काल आला म्हणजे प्रतिदिवसास सूर्याची किरणें उत्तरोत्तर उत्तरेकडील प्रदेशावर लंब लंब पडत जातात, व कर्कवृत्त आले म्हणजे तेथेच थांबतात. नंतर लागलीच तेथून पुनः दक्षिणेकडे मकरवृत्तापर्यंत लंब लंब रेषेने पडत जातात. जणू काय, सूर्यच मकरवृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत व कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंत खेपा घालीत असतो ! एका वर्षामध्ये एक खेप करून सूर्य परत स्वस्थानीं येतो. म्हणून मकर व कर्कवृत्त यांचे दरम्यान प्रत्येक ठिकाण सूर्य वर्षातून दोन वेळां डोकीवर येतो; ह्यामुळे सावलीही कधीं कधीं उत्तरेस पडते व कधी कधीं दक्षिणेस पडते. मकरवृत्ताचे दक्षिणेस सावली नेहमीं दक्षिणेकडे पडते, व त्याचप्रमाणे कर्कवृत्ताचे उत्तरेस सावली नेहमी उत्तरेस पडते. उदाहरणार्थ, काशीक्षेत्र कर्कवृत्ताचे उत्तरेस आहे; तेथे सूर्य कधीही डोकीवर येत नाहीं आणि सावली नेहमीं उत्तरेकडे पडलेली असते. हा जो सूर्य फिरतोसा दिसतो त्या मार्गाच्या बारा राशी व सत्तावीस नक्षत्रे कल्पिली आहेत. पृथ्वीच्याच वार्षिक गतीमुळे सूर्य निरनिराळ्या राशीवर अथवा नक्षत्रांवर आल्यासारखा दिसतो. ह्या मार्गास क्रांतिवृत्त