पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/62

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४९

सर्व ठिकाणी दिवस व रात्र हीं सारख्याच मानाचीं म्हणजे बारा बारा तासांची झाली असती. परंतु, अशी स्थिति नाही, हे आपल्या अनुभवास येते.

 विषुववृत्ताचे दक्षिणेस हिंवाळा असला म्हणजे उत्तर गोलार्धातील लोकांस उन्हाळा असतो; व उत्तर गोलार्धात हिंवाळा असला म्हणजे दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. तसेच, उन्हाळा व हिंवाळा यांचा काळ सहा सहा महिनेपर्यंत असतो; म्हणजे प्रत्येक ठिकाणीं ऐन उन्हाळ्याचा मध्यभाग व ऐन हिंवाळ्याचा मध्यभाग यांमध्ये सहा महिन्यांचे अंतर असते. ह्याचप्रमाणे, उन्हाळा असला म्हणजे रात्रीपेक्षा दिवस मोठा असतो, व हिंवाळ्यांत दिवसापेक्षा रात्र मोठी असते.

 आतां, विषुववृत्ताचे उत्तरेस अगर दक्षिणेस ज्या वेळेस उन्हाळा असतो, त्या वेळी सहा महिनेपावेतों सर्व जागीं एकदम उष्णतेचे मान वाढते; व ज्या वेळी हिंवाळा असतो, त्या वेळी एकदम उष्णतेचे मान उतरते, असें नाहीं. आतां, उत्तर गोलार्धात उन्हाळा लागण्याचा काल आहे असे समजा. ह्या वेळी, प्रथमतः विषुववृत्ताच्या समीप उन्हाळा भासावयास लागतो, व उत्तरोत्तर अधिकाधिक उत्तर दिशेकडे उन्हाळा होत जातो. अशा रीतीने उत्तर गोलार्धात उन्हाळा होत चालला असतांना दक्षिण गोलार्धात अगदी दक्षिणेकडे थंडी भासमान होऊ लागते; व उत्तरोत्तर त्याच्या अलीकडे विषुववृत्ताचे बाजूस थंडी जास्त जास्त पडत जाऊन दक्षिणेस तर फारच थंडी पडते. अशा रीतीनें कांहीं महिने लोट-