पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



ह्याच ज्ञानाचे प्रसाराने त्यांचा उद्योग, व्यापार, संपत्ति व बल हीं वा- ढली आहेत; व म्हणूनच हें खंड सर्व पृथ्वींत पुढे सरसावलेले आहे.

 सृष्टचमत्कारांमध्ये फार महत्त्वाचा ऋतु जो हिंदुस्तानचा पावसाळा, तसेच झाडे व पाऊस यांजमध्ये असलेला अन्योन्यसंबंध, हे अशा प्रकारचे शास्त्रीय विषय होत. ह्या विषयांबद्दल सामान्य लोकांमध्ये फारच अज्ञान आहे. ह्यांविषयी खेड्यांतील लोकांस जितकी माहिती असते तितकीसुद्धां प्रायः शहरांतील लोकांस नसते. "वळिवाचा पाऊस म्हणजे काय," "झडीचा पाऊस म्हणजे काय," "ते पडण्याचे दिवस कोणते" वगैरे माहिती खेड्यांतील लोकांस जशी असते तशी शहरांतल्या लोकांस साधारणतः नसते.

 पाऊस पडणे ही गोष्ट आपल्या इतकी परिचयाची आहे की, त्याबद्दल आपणांस विशेष कांहींच वाटत नाही. "पाऊस कसा पडतो," “गडगडते हे काय" अशा प्रकारचे प्रश्न मुले अगदी लहानपणी आपल्या घरच्या माण- सांस करितात, परंतु त्यांस "इंद्राचा हत्ती समुद्राचे पाणी सोंडेत घेऊन गोड करून फेंकतो म्हणून पाऊस पडतो," व "आभाळांत म्हातारी हरबरे भरडते म्हणून गडगडते" अशा प्रकारची मात्र उत्तरे मिळतात. पुढे, मुले शाळेत जाऊ लागल्यावरही त्यांचे ज्ञानांत विशेष भर पडते असे नाहीं. मराठी क्रमिक पुस्तकांमध्ये पाऊस, मेघ, धुकें, दंव वगैरेबद्दल तांत्रिक माहिती दिलेली असते. परंतु जून लागतांच पावसाळा कां सुरू होतो व ती आॅॅक्टोबर अखेरच कां संपतो, हिंदुस्तानचे निरनिराळे भाग कमी जास्त पाऊस पडण्याची कारणे काय वगैरेबद्दल यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेण्यास साधन नसते. म्याट्रिक्युलेशनपर्यंतचे इंग्रजी अभ्यासक्रमाचीही स्थिती हीच. मात्र नैसर्गिक भूगोलामध्ये नैऋत्येकडील नियतकालिक वारा व ईशान्येकडील नियतकालिक वारा ह्यांजबद्दल थोडी सविस्तर माहिती, तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये ऋतु कसे होतात ह्याबद्दलची सर्व साधा- रण माहिती प्राप्त होते, ह्यापलीकडे कांहीं नाहीं. पुढे कॉलेजचे अभ्यास-