पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



३४

भिंती काळसर असल्या तर ती विशेष गरम असते, हेही आपल्या अनुभवास येते. एकाच धातूची दोन सारखी सारखी भांडी घेऊन एकास काळा व दुसऱ्यास पांढरा रंग लावून ती सारखा वेळ उन्हांत ठेवावीं; नंतर त्यांस हात लावून पहावें तो काळे भांडे पांढऱ्या भांड्यापेक्षां विशेष कढत लागेल. वाफेच्या इंजिनामधील उष्णता परावर्तन पावून कमी होऊ नये, म्हणून त्या इंजिनास बाहेरून काळा रंग दिलेला असतो. एकादा पांढरा शुभ्र पदार्थ उन्हामध्ये डोळ्यांसमोर धरिला तर डोळे दिपतात; परंतु एकादा हिरवा पदार्थ पाहिला तर मनाला किती समाधान वाटते ! ह्याचे कारण हेच की, पांढरा पदार्थ सर्व किरणें परावर्तन करितो व तीं किरणें आपल्या डोळ्यांवर येऊन आपटतात, त्यामुळे आपल्या डोळ्यांस त्रास होतो; परंतु हिरवा पदार्थ बहुतेक किरणें गिळून टाकितो, त्यामुळे त्यांजपासून त्रास होत नाहीं. एकाद्या गर्द झाडांच्या बागेकडे अगर एकाद्या दाट पाने असलेल्या वृक्षाकडे पाहिले असतां आपणांस किती आनंद होतो हे प्रत्यहीं आपल्या अनुभवास येते. ह्या सर्व उदाहरणांवरून काळा रंग हा उष्णताग्राहक आहे, हे अगदी स्पष्ट झाले. झाडांचाही रंग काळसर असतो, म्हणून झाडे आपल्या रंगाच्या योगाने उष्णता नाहींशी करण्यास साधनीभूत होतात, अर्थात् थंडी उत्पन्न करितात, हे सिद्ध झाले.

रसायनव्यापार.

 आतां, रसायनव्यापाराने झाडे उष्णता कशी कमी करितात तें पाहूं. रसायनशास्त्रांतील असा एक नियम आहे की, दोन पदार्थ