पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



३३

आघात यंत्रावर बसून ते यंत्र फिरूं लागते. ह्या यंत्राचे पत्र्यांस काळा रंग न दिला तर ते फिरणार नाहीं.

 काळा रंग उष्णताग्राहक आहे, ह्याचा अनुभव प्रचारांतील पुष्कळ उदाहरणांवरून दृष्टोत्पत्तीस येतो. नुसत्या काळ्या कापडाची छत्री आपण उन्हांतून घेऊन जाऊ लागलों तर तेव्हांच छत्री तापते व छत्री घेणारास गरमा होऊ लागतो. ह्या करितांच छत्रीवर पांढरा अभ्रा घालीत असतात. पांढरा रंग सर्व रंगांची किरणे परावर्तन करतो, म्हणून तो अभ्रा तापत नाहीं. काळ्या छत्रीस पांढरा अभ्रा घालून ती छत्री घेऊन कांहीं वेळ उन्हांतून चालावे, आणि नंतर छत्रीस हात लावून पहावा, म्हणजे अभ्रा थंड लागतो व आंतील कापड गरम लागते. छत्रीवर जीं सूर्याची किरणे पडतात ती सर्व परावर्तन पावल्यामुळे अभ्रा थंड राहतो. आंतील कापडामध्ये जी उष्णता येते ती सूर्याच्या प्रत्यक्ष किरणांपासून फारशी येत नाहीं; परंतु इतर पदार्थांवर पडलेली किरणें परावर्तन पावून ती काळ्या कापडावर पडतात. त्या वेळी ते कापड उष्णता ग्रहण करिते. थंडीच्या दिवसांत आपण काळ्या रंगाचे कपडे वापरले असतां ते जास्त उबदार भासतात ह्याचे कारण हेच. आपण काळ्या रंगाचा अंगरखा घालून उन्हांत गेलो असतां आंगरखा तेव्हांच तापून गरमा व्हावयास लागतो; परंतु तोच जर पांढऱ्या कापडाचा आंगरखा घातला तर कितीही उन्हांत फिरलें तरी तापत नाहीं. खोलीला चुना लाविलेला असला म्हणजे ती विशेष थंड असते, हे नेहमी आपल्या अनुभवास येते; व ह्याच्या उलट ह्मणजे