पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



३२



काळा रंग उष्णताग्राहक आहे, ह्यास पुष्कळ प्रमाणे देता येतील. बाजूस लिहलेल्या आकृतीचे एक यंत्र असते. अ हे एक सुईचे अग्र आहे आणि ब ब ही एक त्या अग्रावर फिरतां येण्यासारखी अर्धवर्तुलाकर तार आहे; ह्या तारेच्या दोन्ही शेवटांस ड, क

हे टिनाचे लहान लहान पत्रे बसविलेले असतात; ह्या दोन्ही पत्र्यांची एक एक बाजू काळ्या रंगाने रंगविलेली असते, व दुसरी बाजू चकचकीत शुभ्रवर्ण असते; आणि ह्या सर्व यंत्रावर काचेचे एक झांकण घातलेले असते. काचेच्या झांकणाचा उपयोग इतकाच की, यंत्रास वाऱ्याची झुळूक लागू नये, किरणें मात्र आंत जावी. हे यंत्र अंधारांत ठेविलें तर वक्र तार बिलकूल फिरत नाही. परंतु ते थोडे उजेडात आणले तर ती लागलीच गरगर फिरू लागते. ह्याचे कारण इतकेच कीं, सूर्याची किरणे आंत शिरून टिनाचे पत्र्यावर पडतात त्या वेळी पत्र्यांस दिलेला काळा रंग सर्व किरणें गिळून टाकितो व पत्र्याच्या आंगचा एका बाजूस असलेला जो चकचकीत पांढरा रंग त्याजवरील सर्व किरणें जोरानें परावर्तन करतो. त्याचा