पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



३१

वर्तन करितात. त्याचप्रमाणे हिरवे जे पदार्थ दिसतात ते हिरव्या रंगाची किरणें खेरीजकरून बाकीच्या सर्व रंगांची किरणें गिळून टाकितात व हिरवे मात्र किरण परावर्तन करितात. किंवा जे पदार्थ तांबडी मात्र किरणे परावर्तन करितात त्यांस आपण तांबडे म्हणतो, व जे पदार्थ हिरवीं मात्र किरणें परावर्तन करितात त्यांस आपण हिरवे म्हणतो, असे म्हटले तरी चालेल. पदार्थाचा रंग म्हणजे त्याचा अमुक एक प्रकारचे किरण परावर्तन करण्याचा धर्म होय. ह्यावरून अंधारांत पदार्थाला रंग नसतो हे उघड होते. आतां, जे पदार्थ सातही रंगांची किरणें परावर्तन करितात त्यांस आपण पांढरे म्हणतो. म्हणजे जो पांढरा रंग रंगसामान्याचा अभाव असा वाटतो तो वस्तुतः सर्व रंगांचा संकर होय. इंद्रधनुष्यामध्ये दिसणारे *सातही रंग कांहीं एका प्रमाणाने मिश्र केले असतां पांढरा रंग उत्पन्न होतो. एक भोंवरा घेऊन त्यावर कांहीं नियमित प्रमाणाने वर सांगितलेल्या सातही रंगांचे उभे पट्टे काढून तो भोंवरा जोराने फिरविला, तर तो पांढरा शुभ्र दिसेल. ह्या धर्माचे उलट जे पदार्थ सर्व रंगांची किरणें गिळून टाकतात त्यांस आपण काळे म्हणतों. प्रचारामध्ये जरी काळा हा एक रंग समजला जातो, तरी शास्त्ररीत्या काळा हा कांहीं रंग नव्हे, तो सर्व रंगांचा अभाव होय. ह्याप्रमाणे काळ्या पदार्थांमध्ये सर्व प्रकारची किरणें गिळून टाकण्याचा धर्म असल्यामुळे ते उष्णता ग्राहक आहेत, हे उघड झाले.

-----

 *इंद्रधनुष्यामध्ये जे सात रंग आहेत त्यांची नांवेंः-तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, व जांभळा.