पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



२२

पाऊस नियमित काळीं नियमित दिवसपर्यंत मात्र पडतो. हा वर्षीतून तीन चार महिनेपावेतों पराकाष्ठा असतो, व सर्व पिके ह्या नियमित काळीं मात्र व्हावयाची असतात; म्हणून पाऊस नियमित वेळीं चांगला पडला तर मात्र पिके चांगली होण्याचा संभव असतो. कित्येक देशांमध्ये कोणतेही पीक पावसावर बिलकूलं अवलंबून नसते. नद्यांना पूर येऊन त्या योगाने नदीकाठच्या जमिनी भिजल्या म्हणजे पिके होतात; व कांहीं ठिकाणीं नद्यांना कालवे काढलेले असून त्या कालव्यांच्या पाण्यावर पिके होतात. आफ्रिका खंडामध्ये मिसर देशांत नील नदीला पूर येऊन त्या पुराच्या पाण्यानेच पिके होतात, व धान्य विपुल होते. अशा ठिकाणी लोकांस पावसाची अगदीं जरूर नसते व दुष्काळ पडण्याची भीति नसते. आपल्या ह्या देशामध्ये सिंध प्रांताची अशी स्थिति आहे. सिंधु नदास पूर येऊन त्या पाण्याच्या योगाने नदीकाठच्या जमिनी पिकतात; शिवाय ह्या नदाचे मोठमोठे कालवे काढले आहेत, त्यांच्याही पाण्याने पुष्कळ जमीन पिकते. एथे पराकाष्ठा ७ किंवा ८ इंच पाऊस वर्षांतून पडतो तरी दुष्काळ म्हणून कधीं पडत नाहीं; कारण, पिके पावसावर अवलंबून मुळीच नसतात. पाऊस पडो अगर न पडो, नदीला पूर आला की झाला सुकाळ ! अशी स्थिति सर्व देशभर असती तर किती चांगले झाले असते ! नाही म्हणावयाला पंजाबमध्ये कित्येक ठिकाणीं यमुना व गंगा ह्या नद्यांचे कालवे काढिले आहेत; त्या प्रदेशांत मात्र दुष्काळ पडण्याची भीति उरली नाही. परंतु, हा प्रदेश ह्या अफाट देशाच्या मानाने पाहि-