पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/15

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६६ पासून ९२ पावेतों आहे. याची लांबी दक्षिणोत्तर १८०० मैलांहून जास्त आहे व पूर्वपश्चिम रुंदी सुमारे १५०० मैल आहे.

 सीमाः--हिंदुस्तानच्या उत्तरेस तिबेट देश असून तिबेट आणि हिंदुस्तान ह्यांच्या दरम्यान हिमालय पर्वताची रांग आहे. वायव्येस व ईशान्येस अनुक्रमें सिंधुनद व ब्रह्मपुत्रनद हे असून त्यांचे पलीकडे डोंगरांच्या रांगा आहेत. ह्या देशाचा दक्षिण भाग हा समुद्राने वेष्टित एक विस्तीर्ण द्वीपकल्पच आहे. ह्यासच दक्षिण (डेक्कन ) असे म्हणतात.

 ह्याप्रमाणे हिंदुस्तानच्या आग्नेयीस, दक्षिणेस व नैर्ऋत्येस समुद्र असून वायव्येस, उत्तरेस व ईशान्येस जमीन आहे. दक्षिणेकडील समुद्र जो हिंदीमहासागर हा विस्तीर्ण जलसमूह असून ह्यामध्ये लहान लहान बेटांशिवाय हिंदुस्तानच्या दक्षिणेस दुसरी जमीन नाही. सिंहलद्वीप म्हणजे लंका हा हिंदुस्तानचाच एक भाग आहे, अशी कल्पना करण्यास हरकत नाही. वायव्य, उत्तर व ईशान्य ह्या दिशांस जी जमीन आहे तिचे आसपास दूर अंतरापावेतो विपुल जमीनच आहे.

 ह्या देशाचे मुख्य भाग तीन आहेत तेः १ उत्तर हिंदुस्तान. २ हिमालय पर्वत. व ३ दक्षिण हे होत. ह्या तीन भागांचे आतां अनुक्रमें वर्णन करूं.

 उत्तर हिंदुस्तान:--हें फारच सुपीक व प्रसिद्ध असें विस्तीण मैदान आहे. हे पूर्वपश्चिम ब्रह्मपुत्रनदापासून सिंधुनदापर्यंत जागा व्यापिते. व दक्षिणोत्तर हिमालयपर्वतापासून दक्षिण पठाराचे