पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रदेशापर्यंत पसरले आहे. म्हणून ह्या मैदानाची लांबी सुमारे १५०० मैल असून रुंदी सरासरी ३०० मैलांपासून ४०० मैलांपर्यंत आहे. हे मैदान आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे म्हणजे हिमालय पर्वताच्या रांगेशी समांतर असे पसरले आहे. व तो पर्वत ह्या मैदानाची उत्तर सीमा आहे.

 ह्या विस्तीर्ण मैदानापैकी एक वाळूचे मैदान खेरीजकरून बाकीचा सर्व भाग एकसारखा सपाट असून त्यांतून जे असंख्य पाण्याचे प्रवाह वाहतात त्यांपासून ह्यास पाण्याचा पुरवठा होतो. ह्यावर अति रुंद व मंद गतीने वाहणाऱ्या अशा समुद्रासारख्या महानद्या आहेत. ह्या प्रदेशापैकीं पूर्वेकडील भाग बंगाल प्रांत हा वरील वर्णनाचे पूर्णपणे उदाहरण होय. हा प्रांत इतका सपाट आहे कीं, ह्यामध्ये एकसुद्धा लहान टेकडी अगर खडक नाहीं; व ह्यामधून गंगानदी अधिकाधिक विस्तीर्ण होत होत वाहात जाते. चीन देशांतील यांगत्सिक्यांग नदीचे कांठचा प्रदेश खेरीजकरून हा प्रांत सर्व पृथ्वीमध्ये अतिशय सुपीक व सुंदर आहे. ह्या नदीच्या वरच्या बाजूस बहार प्रांत आहे. ह्याच्या पृष्ठभागावर मात्र कोठे कोठे फारच लहान लहान टेकड्या आहेत. गंगानदीचे उत्तरेस अयोध्या व रोहिलखंड हे प्रदेश असून ते उत्तर दिशेकडे हिमालय पर्वताचे बाजूस थोडथोडे चढते होत गेले आहेत. ह्या ठिकाणीं गंगानदीचे *खोरे संपून यमुना नदीचे खोरे लागते. ह्या

-----

 *ज्या ज्या ठिकाणचे पावसाचे पडलेले पाणी वाहात जाऊन कोणत्याही एकाद्या नदीस मिळते त्या सर्व प्रदेशास त्या नदीचे खोरे असे म्हणतात.