पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


हिंदुस्तानांतील
पाऊस व झाडें
---------------
भाग १ ला.
---------------
हिंदुस्तानचे भूगोलवर्णन व हवामान

 झाडांच्या वृद्धीपासून व जंगल संरक्षणापासून काय काय व कसकसे फायदे होतात आणि पाऊस कसा पडतो व पावसाचा आणि झाडांचा काय संबंध आहे, हे सांगण्याचा ह्या पुस्तकाचा हेतु आहे. हा विषय चांगला समजण्यास आपल्या ह्या हिंदुस्तान देशाच्या भूगोलाचे संक्षिप्त वर्णन प्रथमतः केले पाहिजे.

भूगोलवर्णन

 हिंदुस्तानाच्या राजकीय विभागांच्या संबंधाने माहिती देण्याचे कारण नाहीं. ही माहिती व कोणकोणतीं शहरें कोठे कोठे आहेत ह्याची माहिती वाचकांस आहे असे गृहीत धरून फक्त डोंगर, नद्या वगैरे संबंधाने हिंदुस्तान देशाची जी स्वाभाविक रचना आहे तिचे वर्णन करूं.

 स्थाननिर्देश व व्याप्ति:–हिंदुस्तान देश हा विषुववृत्ताचे उत्तरेस उत्तर अक्षांश ८ पासून ३६ पावेतों आहे; व पूर्व रेखांश