पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/146

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१३३

समजावयाची. तिसरी एक अडचण अशी आहे की, शेतासभोवती झाडे लाविल्यापासून त्यांच्या मुळ्या जमिनीमध्ये पसरून तींतील पोषक द्रव्ये तीं नाहींतशीं करितात, व त्यामुळे पिकास ती द्रव्यें मिळत नाहींत. ह्याही म्हणण्यांत तथ्य आहे खरे. परंतु ही अडचण दूर करता येण्यासारखी आहे. शेतासभोंवतीं जी झाडे लावावयाची ती मागे सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या मुळ्या पृष्ठभागावर मात्र पसरतात, अशी लावू नयेत. ज्यांच्या मुळ्या जमिनीमध्ये खोल उतरतात, अशी मात्र झाडे लावावीं. उदाहरणार्थ, विशेषेकरून काळ्या जमिनीमध्ये बाभळीची झाडे लावावी म्हणजे ही अडचण सहजच दूर झाली.

 सडका, आगगाड्या वगैरे हरएक प्रकारच्या मार्गावर : - ह्या ठिकाणी झाडे लाविल्यापासून विशेष फायदा इतकाच की, पांथस्थांस व जनावरांस उन्हाचे तापापासून वगैरे आश्रय मिळावा.

 शहरांत दाट वस्तीच्या ठिकाणीं:– ह्या ठिकाणी झाडे लाविल्यापासून महत्त्वाचा फायदा आहे. प्राण्यांची ज्या ठिकाणी जास्त वस्ती त्या ठिकाणच्या हवेमध्ये कार्बानिक आसिड वायूचे प्रमाण जास्त वाढून हवा बिघडते, व त्यामुळे मनुष्याचे आरो- ग्यास अपाय होतो. परंतु अशा ठिकाणी झाडांची वृद्धि जितकी जास्त असेल तितकी हवा शुद्ध होईल. झाडांचा हा गुण अति प्रसिद्ध असून ह्यांचा अशा ठिकाणी उपयोग करून घेतल्याचे फारसे आढळांत येत नाहीं. आरोग्यशास्त्रासंबंधे अनेक दुर्घट