पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/145

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३२

अशी हरकत असते की, अशी झाडे लावल्याने पक्ष्यांस आश्रय मिळून ते झाडांवर वास्तव्य करून पिकाची नुकसानी करतील. परंतु ही समजूत अगदी खोटी आहे. कारण, शेतावर झुंडीच्या झुंडी येऊन पिकाची नासाडी करितात असे जे पक्षी ते एके जागा वास्तव्य करणारे नव्हत; ते स्थलांतर करणारे पक्षी होत. आता, दुसऱ्या जातीचें कांहीं पक्षी ह्या झाडांवर वास्तव्य करतील हे खरे. परंतु पक्ष्यांची अशी रीत आहे की, जोपर्यंत त्यांस खावयास किडा मुंगी मिळते तोपर्यंत ते दाण्यास तोंड लावीत नाहीत. हा एक पक्ष्यांपासून फायदाच * समजावयाचा. कीड मिळेनाशी झाल्यावर मात्र पांखरें दाणे खातील. परंतु पुष्कळ फायदे होत आहेत तर थोडेसे नुकसान सोसले पाहिजे. शेतासभोंवतीं झाडे लावण्यास आणखी अशी एक हरकत आहे की, झाडांच्या सावलीमुळे त्याचे खालीं पीक येत नाहीं, व त्यामुळे पुष्कळ जमीन निरुपयोगी होते. हे म्हणणे अगदी बरोबर आहे. परंतु एथेही वरीलच गोष्ट लक्षात ठेविली पाहिजे की, एकाद्या गोष्टीपासून नुकसान थोडे होत आहे, परंतु फायदा जर जास्त होत आहे तर ती गोष्ट फायद्याची

-----

 * कित्येकांचे असे म्हणणे आहे की, अलीकडे झाडोऱ्याचा फार नाश झाल्यामुळे पक्ष्यांस राहण्यास आश्रय न मिळून त्यांची संख्याही कमी झाली; व त्यायोगानें किडामुंगी यांची वृद्धि जास्त होऊन पिकांची नासाडी होऊ लागली आहे. पक्ष्यांची संख्या जास्त असती तर टोळांची संख्या वाढली नसती, व वरचेवर ज्या टोळधाडी येतात त्याही आल्या नसत्या,