पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२७

 आतां, हिंदुस्तानामध्ये जंगलची व्याप्ति हल्ली किती आहे हे सांगू. अद्यापपावेतों हिंदुस्तानातील डोंगराळ प्रदेश जंगलानें थोडेफार व्याप्त आहेत, ही मोठ्या समाधानाची गोष्ट आहे. हिमालय पर्वताचा डोंगराळ प्रदेश, मध्य हिंदुस्तानातील विंध्याद्रि व सातपुडा ह्यांतील डोंगराळ प्रदेश, दक्षिणेतील सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश व पूर्वघाटचा प्रदेश हे जंगलाने युक्त आहेत. ह्या भागांतसुद्धा कांहीं कांहीं ठिकाणे उजाड झाली आहेत. परंतु हीं ठिकाणे हल्लीं चालू असलेल्या प्रयत्नांनीं पूर्ववत् जंगलाने व्याप्त होतील अशी आशा आहे.

 निरनिराळे प्रांतांमध्ये हल्ली जंगल किती आहे, हे खालील कोष्टकावरून ध्यानात येईल.

प्रांताचें नांव    जंगलचे क्षेत्रफळ     एकंदर क्षेत्राशीं    
चौरस मैल. शेकडा प्रमाण.
बंगाल ९३६६२ १४
मद्रास १७१८७ २०
मुंबई १४५१० ११
एकूण १२५३५९ १४