पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२८

 वरील जंगलाच्या चार जाति करितां येतीलः सदापत्री जंगले, Desiduous जंगलें, रुक्ष जंगलें, व निर्जल जंगलें. निरनिराळे ठिकाणीं पडणारे पावसाचे मानावरून ह्या जाति झाल्या आहेत.

 पहिल्या भागांत सांगितलेले उत्तर हिंदुस्तानचे जे विस्तीर्ण मैदान म्हणजे गंगा व यमुना ह्या नद्यांचे खोरे, ज्यांत संयुक्त प्रांत बहार, व बंगाल ह्यांचा समावेश होतो ते बहुतेक जंगलरहित आहे. एथे जंगल नसण्याचे कारण, हवा पाण्याची प्रतिकूलता नसून जमीन फारच सुपीक असल्यामुळे ती सर्व लागवडीस आलेली आहे हे होय.

 सदापत्री जंगले :–मागें पृष्ठ १०४ ह्यांत सांगितलेल्या जातीची झाडे म्हणजे ज्यांची पाने एकदम गळून पडत नाहीत, अशा झाडांची जंगले पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर मात्र आढळतात. तथापि, दोन्ही ठिकाणच्या जंगलांत सारख्या जातींची झाडे नाहींत. पश्चिम किनाऱ्यावर जो अति वृष्टीचा भाग आहे, त्यांत हीं जंगले आहेत. ह्यांत सागवान, सिसू वगैरे मूल्यवान् झाडे असून शिवाय ताड, माड, बांबू हेही बरेच आढळतात. पूर्व किनाऱ्यावर पाऊस थोडा कमी असल्यामुळे झाडे थोडी लहान आकाराचीं परंतु जास्त कठीण लाकडाची आढळतात. ह्यांत अबनूस हे झाड फार महत्त्वाचे आहे.

 काश्मीर वगैरे हिमालय भागामध्ये मोठमोठालीं पहाडी जंगले आहेत. ह्यांत ओक, देवदार, साल वगैरे झाडें प्रसिद्ध आहेत.

 निर्जल जंगलें:—सिंध, गुजराथ, कच्छ, काठेवाड, राजपुताना व दक्षिण पंजाब; तसेच दक्षिणेत पूर्व म्हैसूर, बल्लारी