पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/139

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१२६

वरून जंगलरक्षण परिणामी लोकांच्या किती फायद्याचे आहे, हें झालेच आहे. इतकेच नव्हे, तर जंगलाचा नाश म्हणजे आपली मोठी हानिच होय. म्हणून जंगलरक्षणापासून थोडीबहुत अडचण व त्रास सोसावा लागला, तरी तो अपरिहार्य समजून रक्षणास आपल्याकडून होईल तितकी मदत प्रत्येकाने केली पाहिजे.

 जंगलखात्याची रचना पुढे सांगितल्याप्रमाणे आहे. हे खाते रेव्हिन्युखात्याचा पोटभाग समजले जाते. जंगलाबद्दल विशिष्ट सल्ला देण्याकरितां हिंदुस्तान सरकाराजवळ इन्स्पेक्टर जनरल् ऑफ फॉरेस्ट्स म्हणून एक कामगार असतो. प्रांतिक सरकाराकडे अशाच प्रकारचा एक कामगार कान्सर्वेटर जनरल म्हणून देण्याचे घाटत आहे. प्रत्येक *इलाख्यांत जे रेव्हिन्यु डिव्हिजन् असतात, त्यांसच प्रायः फॉरेस्ट सर्कल म्हणतात. व त्यावर रेव्हिन्यु कमिशनराप्रमाणे कान्सर्वेटर ऑफ फॉरेस्ट्स हा मुख्य असतो. हा कामगार साधारणतः प्रांतिक सरकाराशीं परस्पर पत्रव्यवहार करू शकतो. ह्याचे हाताखाली जिल्ह्याप्रमाणे भाग असतात त्यांस डिव्हिजन म्हणतात. ह्यांवर अंमलदार असतो त्याचे नांव डिव्हिजनल् फॉरेस्ट ऑफिसर. डिव्हिजनचे पोटविभाग तालुक्यासाखे असतात त्यांस रेंज संज्ञा आहे. व रेंजवरील अधिकाऱ्यास रेंजफॉरेस्ट ऑफिसर म्हणतात. रेंज हा राउंडाचा बनलेला असतो. व त्याजवर भागकारकुनासारखा राउंडगार्ड असतो. राउंडामध्ये बीट असतात; व बिटाचे संरक्षणास जो शिपाई असतो त्यास बीटगार्ड म्हणतात. प्रत्येक बिटामध्ये एक अगर अधिक गांवची जंगलें सामील केलेली असतात.

-----

 *पुढील वर्णन विशेषतः आपल्या मुंबई इलाख्यास लागू आहे.